अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार तरुण ठार!
लाखनवाडा - घारोड रोडवरील घटना!
खामगाव-: आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- अज्ञात वाहनाच्या धाडकेत दुचाकीस्वार दोन तरुण ठार झाल्याची धक्कादायक घटना खामगावच्या घारोड गावात घडली आहे.
२२ मे रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास अजय प्रल्हाद इंगोले (२०), सम्राट रामेश्वर इंगोले (१९)( रा.घारोड, ता. खामगाव जिल्हा बुलढाणा) हे तरुण रात्री नऊ वाजताच्या दरम्यान दुचाकी क्रमांक एम एच १५ डीएक्स १७९७ ने दाढी- कटिंग करण्यासाठी लाखनवाडा येथे गेले होते. सकाळपर्यंत घरी परतलेच नाहीत.२३ मे रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास घारोड – लाखनवाडा दरम्यान रायबरी शिवारातील मालगिरी बाबा मंदिरासमोरील डोंगराच्या पायथ्याशी नाल्याजवळ दोन युवक मृता अवस्थेत पडून असल्याची माहिती मिळतात त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी अष्टपाल प्रल्हाद इंगोले (३०) यांनी तशी तक्रारी हिवरखेड पोलीस स्टेशनला दिली आहे. पुढील तपास एएसआय आनंदा वाघमारे करीत आहेत.