पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकाला लुटमार करणाऱ्यां तिघांपैकी एकाला सिंदखेडराजा पोलिसांनी केले अटक
सिंदखेडराजा : – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- गेल्या काही दिवसांत चोरी, लुटीच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यातील अनेक घटनांमधील दोन घटनांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकाला लुटणाऱ्या एकास पोलिसांनी २० दिवसांनी अटक केली त्याच्याकडून ३० हजार रुपयांचा एवज जप्त केला आहे. इतर दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत ३ मे रोजी पेट्रोल पंपावरून रात्री कॅश घेऊन निघालेल्या व्यवस्थापक विष्णू खरात यांना लुटण्यात आले होते. – या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून अन्य दोघांचा तपास सुरू आहे. या घटनेतील ३० हजार रुपयांचा रोख मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चोरी गेलेल्या कारचा लावला छडा १८ मे रोजी शिवाजीनगर टी पॉइंट येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेसमोरील उभी कार चोरी गेली होती. ही कार समृद्धी महामार्ग पोलिसांनी अडवताच चालकाने तेथून पोबारा केला. ही कार पोलिसांनी जप्त केली आहे. गत काही दिवसात चोरीच्या घटना वाढल्या आहेत.