दुचाकीच्या धडकेत युवक जागीच ठार
पिंपळगाव सराई : -आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- भरधाव दुचाकीनेदिलेल्या धडकेत युवक जागीच ठार झाला. ही घटना २२ मे रोजी रात्री सोनेवाडी येथे घडली. देविदास गजानन काळे (रा. सोनेवाडी, वय २३) असे मृतक युवकाचे नाव आहे.
सोनेवाडी येथील देविदास काळे व शुभम तायडे हे बुधवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान सोनेवाडीजवळील सिमेंट रस्त्याने पायी जात होते. दरम्यान, त्यांना भरधाव दुचाकी क्रमांक एमएच २८ बीएफ ५४९८ ने जबर धडक दिली. दुचाकी चालक मनोज विलास जाधव (रा. हतेडी) याने ट्रिपल सीट चालवत देविदास काळे याला धडक दिली. त्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी मनोज जाधवविरुद्ध रायपूर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास रायपूर ठाणेदार दुर्गेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल शेख राजीक करीत आहेत