मोटरसायकलच्या धडकेने सोनेवाडी येथील युवक ठार
चिखली – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- रायपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सोनेवाडी येथील तरुणाला रस्त्याने पाठीमागून चालत असताना येणाऱ्या मोटरसायकलने जबर धडक दिल्याने तो जागेवरच ठार झाला. सोनेवाडी येथील मृतक देविदास काळे व शुभम तायडे, शिवप्रसाद काळे, अनिल तायडे हे रात्री ९ वाजेच्या दरम्यान सोनेवाडीजवळील सिमेंट रस्त्याने पायदळी चालत होते. त्यांना एम एच २८ बीएफ ५४९८ क्रमांकाची चालवत असलेल्या आरोपी मनोज विलास जाधव रा. हतेडी ता. जि. बुलढाणा याने धडक दिली. यात देविदास काळे या युवकाचा जागेवरच मृत्यू झाला.
विशेष म्हणजे आरोपी मोटासायकलवर ट्रिपल सीट होता. याप्रकरणी रायपूर पोलीस स्टेशनला अनिल भानुदास तायडे रा. सोनेवाडी यांनी सदर घटनेची फिर्याद दिली आहे. रायपूर ठाणेदार दुर्गेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अधिकारी ए एस आय राजेश गवई यांनी कलम ३०४ ए, २७९, ३३७, ३३८, ४२७ निष्काळजीपणे वाहन चालवल्याने देविदास काळे यांचा मृत्यूला कारणीभूत असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार दुर्गेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल शेख राजीक तपास करीत आहे.