बुद्धपौर्णिमेच्या लखलखत्या प्रकाशात प्राण्यांची गणना;ज्ञानगंगा अभयारण्यात २० बिबटे, ३३ अस्वलांसह६०३ अन्य वन्यप्राण्यांचे दर्शन!
बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- अकोला वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या ज्ञानगंगा अभयारण्यात २३ मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या लखलखत्या प्रकाशात वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल २०बिबटे ३३ अस्वलांसह ६०३अन्य वन्य प्राण्यांचे दर्शन झाले आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वन्यजीव विभागाकडून अभयारण्यातील वन्य प्राण्यांची गणना करण्यात येत असते, ही गणना उन्हाळ्याच्या दिवसात पानवट्यावर पाणी पिण्यास वन्य प्राणी येत असल्याने सोपी जाते. त्यामुळे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गणना अनेक वर्षापासून केली जाते असते. यावर्षी देखील बुद्ध पौर्णिमेच्या रात्री ज्ञानगंगा अभयारण्यातील खामगाव व बुलडाणा वन्यजीव परिक्षेत्रात वन्य प्राणी गणना करण्यात आली आहे.
यासाठी नक्षत्रवण, टॉवर, निसर्ग परिचय केंद्र, बोरवण, मोहिमेची झिल, पिंपळदरी,संरक्षण कुटी वाकी, हापसी, वैरागड संरक्षण कुठे, मारुतीचा पेठा तारापूर, वनकुटी, इकोफ्रेंडली बशी,पलढण धरण, माटरगाव धरण, गिरोली धरण, बोथा तलावासह अशा एकूण १९ पानवटे परिसरात मचाण उभारण्यात आले होते.या मचानांद्वारे नागपूर, अकोला, जळगाव (खान्देश),बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटक व वन्य विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्राणी बघत निसर्ग अनुभूती घेतली. जवळपास पर्यटक व वन विभागाची टीम अशा एकूण ८० जणांनी प्राणिगणना केली आहे. पर्यटकांकडून प्रत्येकी दोन हजार चारशे रुपये प्रवेश शुल्क घेण्यात आले.यामध्ये पर्यटकांना जेवण, नाश्ता, चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पर्यटकांसोबत गाईड देण्यात आला होता.पर्यटकांना वन विभागाच्या वाहनाद्वारे मचानापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी दिपेश लोखंडे यांनी दिली आहे.या १९ पानवट्यांवर रात्रभर कून सहाशे तीन वन्य प्राणी आढळून आले आहेत. यामध्ये खामगाव व बुलढाणा वन्यजी परिक्षेत्राअंतर्गत २० बिबटे,३३ अस्वल,१७७ रानडुक्कर ८ सायाळ,१५ ससे ,५ तडस, ७ भेडकी,१६५ निलगाई, १४० मोर/ लांडोर, ९ चिंकारा,२१ हरिण,२ खवले मांजर,१ रानमांजर असे एकूण ६०३ वन्य प्राण्यांचे दर्शन झाले आहे.