जिजामाता महाविद्यालयाच्या मैदानावर बाहेरच्यांना फुटबॉल गोळा फेक व क्रिकेट खेळण्यावर प्रतिबंधक
जिजामाता महाविद्यालयाचे मैदान महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध
बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- बुलढाणा शहरातील जिजामाता महाविद्यालयाचे मैदान हे आज तळागाळात सर्वांनाच माहित आहे. अनेकांचे करियर भविष्य या मैदानावर घडले आहे. मात्र आता महाविद्यालय व्यवस्थापनाने प्रतिबंधात्मक नियमावली घोषित केली आहे महाविद्यालयाच्या परवानगीशिवाय या ठिकाणी कुठल्याही प्रकारची खेळ स्पर्धा किंवा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करू नये तसेच महाविद्यालयाच्या मैदान परिसरात अमली पदार्थांचे सेवन करू नये अन्यथा पोलीस प्रशासनाच्या सहाय्याने संबंधित विरोधात दंडात्मक कठोर कारवाई करण्यात येणार आहे. असा इशारा जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत कोठे यांनी दिला आहे. हे मैदान केवळ फक्त ज्येष्ठ आणि सुज्ञ नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सकाळी 6:30 ते 10:00 पर्यंत व सायंकाळी4:30 ते 7:00 पर्यंतच मैदान फिरण्यासाठी खुले राहणार या वेळेत बाहेरील व्यक्तींना मैदान व महाविद्यालय परिसरात प्रवेश मिळणार नाही मात्र मैदानावर कोणालाही आपले वाहन अथवा पाळीव प्राणी आणता येणार नाही. याव्यतिरिक्त बाहेरील कोणीही या मैदानावर क्रिकेट फुटबॉल गोळाफेक किंवा इतर खेळ खेळू नये खेळवल्यास प्रतिबंधक कारवाई केली जाणार आहे.
या संदर्भात आज एक सूचनावली जाहीर करण्यात आली आहे. प्राचार्य डॉ कोठे यांनी सांगितले की श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा यांच्यावतीने सर्व बुलढाणा कर नागरिकांना महाविद्यालयाच्या मैदानाचा वापर करण्याबाबत महत्त्वाचे आव्हान करण्यात येत आहे महाविद्यालयाचे खेळाचे मैदान व खुली जागा ही जिजामाता महाविद्यालयाची असून मैदानाचा उपयोग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी केला जातो याव्यतिरिक्त कोणीही क्रिकेट फुटबॉल गोळा फेक किंवा इतर खेळ खेळू नये खेळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असे आव्हान जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रशांत कोठे यांनी केले आहे