पीडितेला घरामध्ये डांबून मारहाण केल्याप्रकरणी..
आरोपीस २ वर्ष ६ महिने सक्तमजुरीची शिक्षा व २१ ह.दंड
बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- पिडीतेला घरामध्ये डांबून मारहाण केल्याप्रकरणी २ वर्ष ६ महिने सक्तमजूरीची शिक्षा व २१ हजार रुपये दंड असा महत्वपुर्ण निकाल आर. एन. मेहरे मा. न्यायाधीश विशेष न्यायालय, बुलढाणा यांनी शुक्रवार २४ मे २०२४ रोजी निकाल दिला आहे.
सदरची घटना ही पुंडलिक नगर चिखली येथील असून यातील आरोपी दिलीप हरिकिसन जयस्वाल (वय ५८) यांचेविरूध्द पो. स्टे. चिखली येथे ३५ वर्षीय पिडीतेने २५ सप्टेंबर २०१९ रोजी दाखल केलेल्या तकारीवरून त्याच्याविरूध्द भा. दं. वि. चे कलम ३७६ (२) (ह), ३४२,३२४,५०६ व अॅटॉसिटी अॅक्टचे कलम ३ (२) (va), ३(१) (w) (i). ३ (१) (w) (ii) दाखल करण्यात आला होता. दरम्यान पिडीतेची तक्रारीत म्हटले की, आरोपी दिलीप जयस्वाल याने पिडीतेला त्याच्या राहते घरी पुंडलिक नगर येथे बोलावून वेळोवेळी मुला मुलींचा सांभाळ करेल, व तुझ्या मुलीचे लग्न मी लावून देईल असे आमिष दाखवून तिचेवर बळजबरीने शारीरिक संबंध केला व अशाच प्रकारे २४ सप्टेंबर २०१९ रोजी संध्याकाळी तिला घरी बोलावून डांबून ठेवले व घरामध्ये कोंडून ठेवून व तिचे सोबत वाद करून तिला फावड्याच्या दांड्याने पाठीवर डोक्यावर व दोन्ही हातावर मारहाण केली होती अशा
प्रकारची तकार पिडीतेने पो. स्टे. चिखली येथे दाखल केल्यावरून आरोपीविरूध्द वरील प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास पो. नि. सचिन चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी केला होता. सबळ पुरावा मिळाल्यानंतर वरीलप्रमाणे आरोपीविरूध्द दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. याप्रसंगी दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सदर खटला पुराव्याकामी लागल्यानंतर आरोपाविरुध्द दोष सिध्द होण्याच्च्या दृष्टीकोणातून जिल्हा सरकारी वकील वसंत लक्ष्मणराव मटकर यांनी ७ साक्षीदार तपासले त्यापैकी पिडीता/फिर्यादी, घटनास्थळ व जप्ती पंच, वैद्यकीय अधिकारी व तपास अधिकारी यांची साक्ष महत्वाची राहिली. विशेष बाब म्हणजे सदर खटल्यामध्ये सर्व साक्षीदाराने सरकार पक्षास मदत केलेली आहे व पिडीतेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु, पिडीतेने आरोपीसोबत संमतीने शारिरीक संबंध ठेवले होते ही बाब वि. न्यायालयाचे निदर्शनास आल्यामुळे आरोपीला वि. न्यायालयाने भा. दं. वि. चे कलम ३७६ (२) (ह). ५०६ व अॅट्रॉसिटी अॅक्टचे कलम ३(२) (va), ३(१) (w) (i). ३ (१) (w) (ii) नुसार निर्दोष मुक्त केलेले आहे. तर भा. दं. विचे कलम ३२४ व ३४२ नुसार दोषी ठरवून भा. दं. वि. चे कलम ३२४ नुसार २ वर्ष सक्त मजूरी व २०००० रू. दंड तर भा. दं. वि. चे कलम ३४२ नुसार ६ महिने सक्त मजूरी व १०००/- दंड वरील दोन्ही दंड न भरल्यास ३ महिने व १ महिना अनुकमे साध्या कारावासाची शिक्षा अशाप्रकारे शिक्षा सुनावलेली आहे. एकंदरीत सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल वसंत लक्ष्मण भटकर यांनी आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा होण्याच्या दृष्टीकोनातून प्रभावी युक्तीवाद सर्व शिक्षा आरोपीस एकत्रीत भोगावयाचे आहेत तर सदरचा खटला यशस्वी होण्यासाठी पो. नि. सचिन चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते तसेच मजकूर न्यायालयीन वकिली P.O.E.C. नंदाराम इंगळे आणि अशोक गायकवाड यांनी पूर्ण सहकार्य केले.