Homeक्राईम डायरीबुलढाणा घाटाखाली
खामगावात अज्ञाताकडून धारधार शस्त्राने एकाचा खून!
खामगावातील बस स्टँड समोरील घटना
खामगाव( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी): गुन्हेगारीच्या बाबतीत बुलढाणा जिल्हा खुपचं पुढे जात आहे. थरकाप उडविणारी घटना खामगाव शहरात घडली आहे.खामगावात धारधार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना समोर येत आहे.खामगाव बस स्टँड समोरील पानपट्टी चालकाला एका अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना २६ मे रोजी रात्री १० वाजताच्या दरम्यान घडली आहे.प्रकाश सोनी असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे, खामगाव शहर पोलीस निरीक्षक नाचनकर यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल करण्यात आला होता.वृत्तलिहेपर्यंत आरोपीचा शोध चालू होता.