वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे इलेक्ट्रिक ग्राहक चिंता ग्रस्त, व्हीसीबी दुरुस्ती रखडली!
अघोषित भरनियमाचा कहरच उकाड्याने रुग्ण,नागरिक त्रस्त!व्हीसीबी नादुरुस्त जनमित्रांचीही डोखेदुखी....
दे/राजा (एकनाथ माळेकर – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी) – देऊळगाव राजा तालुक्यातील पाडळी शिंदे या परिसराला कृषी व गावठाण दोन व्हीसीबी आहेत त्यातील एक व्हीसीबी खराब झाल्याने दोन्ही फिटर एकाच व्हीसीबीवर जोडल्याने दोन्ही चा भार जोडल्याने गावठाण वर बिघाड झाला तर कृषी बंद तर कृषी वर बिघाड झाला तर गावठाण बंद यामुळे परिसराला अघोषित भरनियमाचा फटका ऐन उकड्यात सहन करावा लागत आहे तसेच व्हीसीबी दुरुस्तीचे काम कित्येक दिवसापासून त्यातील लागणारे दुरुस्तीचे सामान ची मागणी केली असल्याचे आधिकारी सांगत असून याचा फटका डीग्रस फिटर वरील गावांना बसत असून याचा सर्वांत जास्त मानसिक त्रास जनमित्र यांना सहन करावा लागतो त्याना नेमून दिलेल्या गावातील ब्रेक डाऊन काढण्यासाठी गावठाण व कृषी बंद करून घेऊन बिघाड शोधावा लागत आहे व परिणामी त्यांना गावकरी व शेतकरी यांच्या ही रोषाला सामोरे जावे लागत आहे तर काही ऑपरेटर नियम सांगत असल्याने व आधिकारी वसुलीसाठी तगादा लावत असल्याने या सर्व प्रकारात व्हीसीबी नादुरुस्तीचा त्रास नागरिक यांच्या बरोबरीत जनमित्रांना त्रास सहन करावा लागत आहे. व वातावरणात वाढलेल्या उकाड्याने जीव कासावीस होत असताना रुग्णांचे व लहान मुले व नागरिक या सर्वांचे तर हाल या अघोषित भारनियमन ने होत असून आधिकारी सदर काम लवकरच करू हा पाढा नेहमीच सुरू ठेवीत असून लवकरच आता परिसरातून उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच दिवसभरात देऊळगाव मही ३३/११केव्ही सब स्टेशन अंतर्गत असणारे डीग्रस फिटर गावठाण व कृषी दिवसभरात एक तास सुद्दा सुरळीत चालू शकत नाही एवढे मात्र खरे!
लोकप्रतिनिधी,आधिकारी यांची डोळेझाक डीग्रस फिटर गावठाण व कृषी नेहमीच रडगाणे असतांना आधिकारी नुसते वेळ मारून नेत कायमस्वरूपी उपाय योजना करण्यात येत नाही तर या भागाचे लोकप्रतिनिधी यांना तर याकडे लक्ष देण्यास वेळ नाही हे वास्तव आहे! डीग्रस गावठाण व कृषी लांबी जास्त असल्याने या फिटर वर मध्यभागी नवीन ओव्हरलोड फिटर कार्यान्वित करणेय आवश्यक आहे ते मध्यबिंदू च्या ठिकाणी करण्याची गरज असतांना आधिकारी नुसते लवकरच नवीन फिटर होईल हे बोलून मोकळे होत आहे
डीग्रस फिटरचे नेहमीच रडगाणे असल्याने यावर वीज पुरवठा सुरळीत चालत नसल्याने व एकाच व्हीसीबीवर गावठाण व कृषी असल्याने वारंवार ट्रीपिंग मुळे जनजीवन विस्कळीत होत असताना कोणीच याकडे लक्ष देत नसल्याने प्रसार माध्यम प्रतिनिधी यांना रुग्ण ,वृद्ध , भ्रमणध्वनी वरून याबाबत आवाज उठविण्याची मागणी करीत आहे कृषी पपं बिघाड ची डोखेदुखी कायमच अगोदरच सातव्या दिवशी आलेल्या कृषी पपं वीज पुरवठा बिघाड झाला तर देऊळगाव मही येथील एबी स्विच खराब असल्याने जनमित्र यांची डोखेदुखी शेतकरी वर्ग यांच्या बरोबरीने वाढली आहे.