चिखली शहरातील आपत्तीजनक होर्डिंग्स बोर्ड तात्काळ हटवा. मनसेची मागणी
चिखली- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- गत काही दिवसापूर्वी मुंबई घाटकोपर येथे अनाधिकृत होर्डिंग्स बोर्ड (जाहिरात फलक) कोसळुन मोठी दुर्घटना झाली आहे. यामध्ये १९ निष्पाप नागरीकांचा दुर्देवी मृत्यु झाला तर सुमारे ९१ जण गंभिर रित्या जखमी झाले आहे.
चिखली शहरात अशाच प्रकारचे अनेक अनाधिकृत होर्डिंग्स बोर्ड (जाहिरात फलक) ठिकठिकाणी लावलेले आहे. या होर्डिंग्स बोर्डामुळे पुन्हा मुंबई घाटकोपर सारखी एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिनांक 24 मे 2024 रोजी मुख्याधिकारी चिखली यांना निवेदन देण्यात आले. तरी चिखली शहरातील असलेले खामगांव चौफुली, बुलडाणा बायपास, अशोका लॉज जवळ, रेस्ट हाऊस, बस स्थानक परीसर, कामाक्षी हॉटेलवर, गवारे कॉम्प्लेक्स, हॉटेर माहेर, उबाळे यांचे स्नेहा स्टिल वर, महाबिज जवळ, माँ साहेब जिजाउ पुतळयाजवळ, जाफ्राबाद रोड, राजे संभाजी नगर मधील देशमुख यांचे घरावर इत्यादी ठिकाणचे संपुर्ण होर्डिंग्स बोर्ड तात्काळ हटविण्यांत यावे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाच्या आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. त्यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, तालुकाध्यक्ष विनोद खरपास, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कापसे, मनसे रस्ते आस्थापना जिल्हा संघटक प्रदीप भवर, तालुका सचिव प्रवीण देशमुख, उपशहर अध्यक्ष रवी वानखेडे, शहर सचिव अजय खरपास, उप तालुकाध्यक्ष मयूर पऱ्हाड, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष अरुण येवले, विभाग अध्यक्ष समाधान मस्के, मंगेश उगले, दिनकर खरपास, पंढरी मैद, युसुफ शेख, मधुकर ठेंग, संजय दळवी, अंकित कापसे यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.