जगाला बुध्द तत्वज्ञानाची गरज- संदिपभाऊ गवई
बुद्ध पौर्णिमा तथागत ग्रुपच्यावतिने मोठ्या उत्सहात साजरी...
मेहकर – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- समाधान सरकटे – बुद्ध पौर्णिमे निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाटीका मेहकर येथे खिरदान वाटप तसेच वृक्षारोपण, व तथागत भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन व तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहून सर्वाना बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार बोधिसत्व, महामानव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे पूजन करून त्यांना अभिवादन तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई यांनी केले. याप्रसंगी आपले विचार व्यक्त करताना बोलत होते, अनिष्ट व कालबाह्य रूढी, अंधश्रद्धा व मानवतेला शरमेने मानखाली घालायला लावणाऱ्या गोष्टीच्या विरोधात बंड पुकारणारे तथागत भगवान गौतम बुद्ध हे केवळ एक धर्म संस्थापकच नव्हे तर संपूर्ण मानवतेला मुक्तीचा मार्ग दाखवणारे महात्मा होते. तब्बल अडीच हजार वर्षांपूर्वी सत्य, अहिंसा, शांती आणि प्रेमाचा संदेश जगाला देणाऱ्या गौतम बुद्धांची शिकवण आजही तेवढीच समायोजित असून आजच्या समाज जीवनाला व भविष्यातील आपल्या वाटचालीला कायमस्वरूपी दिशादर्शक असल्याचे मत संदिपभाऊ गवई यांनी व्यक्त केले..