Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

शेळी, कुक्कुट, गाय, म्हैस पालन प्रशिक्षण

Spread the love

बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्‍हा बातमी : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे शेळी, कुक्कुट, गाय आणि म्हैस पालन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारा जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योग, व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींसाठी बुलडाणा येथे शेळी, कुक्कट, गाय, म्हैस पालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि. 1 ते 5 जून 2024 या पाच दिवसाच्या कालावधीत करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश सुशिक्षित बेरोजगारांनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करावा हा आहे.सदर प्रशिक्षणात शेळी, कुकुट आणि गाय म्हैस पालनाचे तंत्र आणि प्रकार त्यांच्या जाती, लसीकरण, संशोधन रोग व लक्षणे, खाद्यनिर्मिती व चार्याचे प्रकार व उद्योग सुरु करण्यासाठी संपूर्ण सहकार्य त्यासोबतच उद्योजकता विकास, उद्योग संधी मार्गदर्शन, सहकार्य, शासकीय योजनांची माहिती आदी प्रशिक्षणात मार्गदर्शन तज्ज्ञ व्यक्ती करणार आहे.

प्रशिक्षणात प्रवेश घेऊ इच्छिणारा उमेदवार किमान पाचवी पास, वय १८ ते ५० वर्षे असावे. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाईल, प्रशिक्षण नोंदणीसाठी दि. १ जून २०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत गणेश गुप्ता, प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, तहसील कार्यालयाजवळ, चिखली रोड, बुलडाणा संपर्क क्रमांक ८२७५०९३२०१, ९०११५७८८५४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page