Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

चोविस तासांपासून वीज यंत्रणा दुरूस्तीचे युध्दपातळीवर काम सुरू

महावितरण कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अतीरिक्त १५० कंत्राटदार कर्मचारी मदतीला अनेक भागाचा वीज पुरवठा पुर्ववत

Spread the love

बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्‍हा बातमी-   जिल्ह्यात  संध्याकाळच्या दरम्यान मलकापूर ,खामगाव,शेगाव,नांदुरा आणि संग्रामपूर भागात झालेल्या चक्रीवादळामुळे उध्वस्त झालेली वीज यंत्रणा पुर्ववत करण्यासाठी महावितरणची यंत्रणा २४ तासांपासून युध्दस्तरावर कार्यरत असल्याने अनेक भागाचा वीज पुरवठा पुर्ववत करण्याला यश आला आहे.उर्वरीत भागाचा वीज पुरवठा दुरूस्तीसाठी कर्मचारी कार्यरत आहे.

जिल्ह्यात झालेल्या चक्रीवादळाचा वेग एवढा प्रचंड होता की,उच्चदाब व लघुदाबाचे शकडो वीज खांब जमिनदोस्त झाल्यामुळे मलकापूर आणि खामगाव विभागील २३ उपकेंद्रे ही अंधारात गेली होती.यामध्ये ३३ केव्ही सालीपुरा, ३३ केव्ही जांभूळधावा , ३३ केव्ही हरसोळा, ३३ के.व्ही. एपीडीआरपी, ३३ केव्ही दाताळा , ३३ केव्ही बेलाड, ३३ केव्ही दसरखेड, ३३ केव्ही नांदुरा ,३३ केव्ही फुली , ३३ केव्ही महाळुंगे , ३३ केव्ही सुजातपुर , ३३ केव्ही नायगाव , ३३ केव्ही चांदुर , ३३ केव्ही मोताळा , ३३ केव्ही पोफळी , ३३ केव्ही किनोळा , ३३ केव्ही वाघजळ, ३३ केव्ही सावरगाव, ३३ केव्ही वडजी, ३३ केवी पिंपळगाव काळे, ३३ केव्ही आसलगाव,३३ केव्ही नारखेड आणि ३३ केव्ही निमगाव उपकेंद्राचा समावेश आहे. कार्यकारी अभियंता रत्नदिप तायडे आणि मुळे यांच्या मार्गदर्शनात रात्रीतून सुरू केलेल्या कामामुळे ३३ केव्हीसालीपुरा,३३ केव्ही जांभूळधावा,३३ केव्ही दाताळा,३३ केव्ही नांदुरा,३३ फुली, ३३ केव्ही महाळुंगे,३३ केव्ही सुजातपुर,३३ केव्ही नायगाव,३३ केव्ही चांदुर,३३ केव्ही पोफळी आणि ३३ केव्ही किनोळा उपकेंद्राचा वीज पुरवठा पुर्ववत करण्यात आला आहे.

बुलडाणा विभागात ३३ केव्ही किनगाव आणि ३३ केव्ही साखरखेर्डा उपकेंद्राचा बंद पडलेला वीज पुरवठा रात्रीतून पुर्ववत करण्यात आला आहे.परंतू किरकोळ दुरूस्ती करण्याचे काम सुरू आहे.याशिवाय जिल्हयात खामगाव विभागातील खामगाव,शेगाव,संग्रामपूर परिसरात वादळाचा फटका बसल्याने शेकडो वीज खांब जमिनदोस्त झाले आहे.महावितरणच्या अविरत प्रयत्नाने शेगावचा वीज पुरवठा पुर्ववत करण्यात आला आहे.खामगावाचाही बराच भाग पुर्ववत झाला आहे. उर्वरीत वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचारी व कंत्राटदार एजन्सीचे कर्मचारी कार्यरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page