अखेर महीला सरपंचाचे आत्मदहन आंदोलन स्थगित
महसूल विभाग एक जूनपर्यंत रेती घाटाची तांत्रीक मोजनी करण्याच्या लेखी आश्वासनाने अखेर महीला सरपंचाचे आत्मदहन आंदोलन स्थगित
सिंदखेडराजा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- अनिल दराडे-सिंदखेडराजा तालुक्यातील निमगाव वायाळ येथील शासकीय रेती घाटातून लाखो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन झाले असून सदर घाटाची तांत्रिक मोजमाप करून सीसीटीव्ही फुटेज मिळत नसल्याने अखेर महीला सरपंच यांनी निमगाव वायाळ रेती घाटात 27 मे रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता सदर आत्मदहन आंदोलन रद्द करण्यासाठी महसूल व पोलिस प्रशासनाला यश मिळाले असून सिंदखेडराजा तहसिलदार प्रविण धानोरकर यांच्या आदेशाने सरपंच सौ शिलाबाई रामेश्वर चाटे यांना लेखी पत्राद्वारे सदर रेती घाटाचे 1 जूनपर्यंत मोजमाप करण्याचे पत्र नायब तहसीलदार संदीप बंगाळे मंडळ अधिकारी मस्के तलाठी यशवंत घरजाळे, विष्णू थोरात, राहुल देशमुख,आकाश मघाडे कोतवाल यांच्या उपस्थितीत सदर आत्मदहन स्थगित करण्यात महसूल विभागाला यश प्राप्त झाले तर किनगाव राजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार विनोद नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिवन जायभाये, मिलींद सोनपसारे सचिन परसुवाले, चालक सवडे,महीला पोलिस कर्मचारी सोनल चव्हाण, अनुराधा दुडीयार यांनी सकाळी सहा वाजेपासून खडक पुर्णा नदीपात्रात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त तैनात केला होता यावेळी निमगाव वायाळ येथील मोठ्या प्रमाणात नागरीक उपस्थित होते