उन्हाचा पारा वाढला नागरिकांनो बाहेर निघताना काळजी घ्या
बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- दिवसेंदिवस उन्हाचे चटके बसत आहे त्याचप्रमाणे उन्हाचा पारा सुद्धा जलद गतीने वाढत आहे. उन्हाच्या तापमानामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. एकेकाळी बुलढाणा जिल्हा हा थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जात असे या ठिकाणी टुरिस्ट लोक सुद्धा येत होते. उन्हाळा लागला तरी जिल्हावासीयांना उन्हाळा जाणवत नव्हता. त्याकाळी तापमान सुद्धा वाढत नव्हते मात्र कालांतराने आता वृक्षाची मोठ्या प्रमाणात तोड झाली आणि थंड वातावरण असलेला हा जिल्हा अचानक तापमानाच्या भौऱ्यात अडकला आहे.
जिल्ह्याचे तापमान 40 ,42, 44 ,45 जाताना दिसून येत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात जिल्हावासीयांना उन्हाच्या चटक्याचा त्रास सहन करावा लागत आहे.जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली आहे या ठिकाणी उष्माघाताच्या बळी पडणाऱ्या रुग्णांवर उपचार या ठिकाणी करण्यात येत आहे. उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी उष्मा लाटेपासून वाचण्याच्या दृष्टीने ही काळजी घ्यावी उन्हात अति कष्टाचे कामे करू नका, दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे व बाहेर पडल्यास रुमाल टोपीचा वापर अवश्य करावा. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी, बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी, लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार केलेल्या वाहनात ठेवू नये, उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका असे अनेक प्रकारची काळजी आपण उन्हाळ्यामध्ये घ्यावे जेणेकरून आपण उष्माघातीला बळी पडणार नाही असे आपला बुलढाणा जिल्हा बातमीशी बोलताना डॉ. भुसारी यांनी सांगितले आहे