Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाण्यात दाखल..
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दि 29 मे रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले असुन नुकतेच त्यांचे हेलिकॉप्टर हे हेलिपॅड वर दाखल झाले.ते शिवसेना बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा पृथ्वीराज संजय गायकवाड यांच्या विवाह सोहोळ्यात हजेरी लावणार आहे.मुख्यमंत्री शिंदे हे बुलढाण्यात दाखल होताच त्यांचे स्वागत आ. संजय गायकवाड यांनी स्वागत केले आहे..यावेळी गायकवाड यांच्या सोबत युवा सेना कार्यकारिणी सदस्य मृत्युंजय गायकवाड व युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत गायकवाड आणि शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते