वाहनांवर 7 लाख 75 हजार रूपयांची दंडात्मक कारवाई
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कार्यालयाकडून विना वाहन नोंदणी क्रमांक, वाहन नोंदणी क्रमांक नियमानुसार नसणे, तसेच फॅन्सी वाहन क्रमांक असणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायदा आणि नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे. गेल्या वर्षी 475 वाहनांवर 7 लाख 75 हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.एप्रिल 2023 ते मार्च 2024 या आर्थिक वर्षात चालू वर्षी एप्रिल ते 24 मे 2024 पर्यंत कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षी एप्रिल 2023 मध्ये 22 वाहनांवर 44 हजार रूपये दंड आकारण्यात आला. मे 2023 मध्ये 48 वाहनांवर 94 हजार रूपये, जून 2023 मध्ये 44 वाहनांवर 79 हजार रूपये, जुलै 2023 मध्ये 41 वाहनांवर 44 हजार रूपये, ऑगस्ट 2023 मध्ये 37 वाहनांवर 65 हजार 500 रूपये, सप्टेंबर 2023 मध्ये 17 वाहनांवर 18 हजार रूपये, ऑक्टोबर 2023 मध्ये 23 वाहनांवर 24 हजार रूपये, नोव्हेंबर 2023 मध्ये 32 वाहनांवर 58 हजार रूपये, डिसेंबर 2023 मध्ये 57 वाहनांवर 72 हजार रूपये, जानेवारी 2024 मध्ये 68 वाहनांवर 1 लाख 31 हजार 500 रूपये, फेब्रुवारी 2024 मध्ये 54 वाहनांवर 87 हजार रूपये, मार्च 2024 मध्ये 32 वाहनांवर 58 हजार रूपये दंड आकारण्यात आला.चालू वर्षात एप्रिल 2024 मध्ये 44 वाहनांवर 81 हजार रूपये, मे महिन्यात आतापर्यंत 183 वाहनांवर 3 लाख 47 हजार 500 असा 227 वाहनांवर 4 लाख 28 हजार 500 रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.