Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)
पाणी टंचाई निवारणार्थ गिरडा, बोदेगाव येथे टँकर मंजूर
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी: जिल्ह्यातील काही तालुक्यात सद्यस्थितीत पिण्याच्या स्त्रोतापासून आवश्यक पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे गिरडा, बोदेगाव गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. दरडोई दरदिवशी 20 लिटर्स उपलब्ध होण्यासाठी पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. गिरडा आणि बोदेगाव, ता. बुलडाणा येथे एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. गिरडा व बोदेगाव या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे सदर गावामधील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे, असे उपविभागीय अधिकारी, बुलडाणा यांनी कळविले आहे.