मोबाईल चोरून पळून जाणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी पाठलाग करून पकडले..
डि बी पथकाची यशस्वी कामगिरी
चिखली :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- दि. २७ मे रोजी चिखली येथील आठवडी बाजार असल्याने साकेगाव येथील सुरेश विजयसिंग परिहार हे सायंकाळी ५:३० वाजता चिखली शहरातील पारधी बाबा रोड वरील भाजीपाल्याच्या दुकानात भाजीपाला घेण्यासाठी खाली वाकले असता त्यांच्या पॅंटच्या मागील खिशात ठेवलेला रिअल मी एक्स कंपनीचा मोबाईल एक इसम गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या खिशातून काढून घेऊन डी पी रोडकडे पळत जात असताना सुरेश परीहार हे त्याच्या मागे पळत गेले, डी पी रोडवर ड्युटीवर तैनात असलेल्या पोलिसांना सदर चोरटा इसम पळत असतांना लक्ष्मी मार्केट मध्ये पोलिसांनी त्या चोरट्यास पटलाग करून पकडले. त्यानंतर सुरेश परीहार यांनी पोलिसांना सांगितले की सदर ह्या इसमाने माझा मोबाईल चोरला आहे, त्यावर त्या इसमाची पोलिसांनी झडती घेतली असता त्या इसमा जवळ सुरेश परीहार यांच्या व्यतिरिक्त आणखी ५ मोबाईल मिळून आले. सदर त्या इसमाची कसून विचारपूस केली असता त्याने अब्बास याकूब पटेल, ( वय ४२ वर्ष रा. कावी, ता. जंबसुर, जि. भरुच, गुजरात ) असे सांगितले. सुरेश परीहार यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चोरट्या ईसमा विरूद्ध अप क्र ४०४/२४ कलम ३७९ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदर या गुन्ह्याच्या संबंधाने पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी पोलीस स्टेशनचे डी बी पथक प्रमुख यांना गुन्हा संदर्भाने सखोल तपास करून अजून आरोपी आहेत का बाबत सूचना दिल्या वरून डीबी पथकाचे इंचार्ज पोऊनी नितीनसिंह चव्हाण, पोना अमोल गवई, पोकॉ रोहिदास पंढरे, पंढरीनाथ मिसाळ, सागर कोल्हे, राहुल पायघन, निलेश सावळे यांनी आरोपी अब्बास याकूब पटेल याची सखील विचारपूस केली असता त्याने सांगीतले की, देऊळघाट ता. जि. बुलढाणा येथील शेख मोइन यानेच मला चिखलीच्या बाजारामध्ये मोबाईल चोरी करण्यासाठी आणले होते. या त्याच्या सांगण्यावरून शेख मोईन याचा शोध घेण्यासाठी बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील देउळघाट येथे जाऊन सदर आरोपीस मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याबद्दल विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने आरोपी १) अब्बास याकूब पटेल ( वय. ४२ वर्ष, रा. कावि ता. जंबसुर, जि. भरूच गुजरात ), २) शेख मोईन शेख मुकीम ( रा. सय्यद मोहल्ला, देउळघाट, ता. जि. बुलढाणा ) या दोन आरोपींच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपनीचे ६ मोबाईल एकूण किंमत ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून या दोन्हीही आरोपींना अटक केली.
सदरची कारवाई हि पोलीस अधीक्षक बुलढाणा, अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा, उपविभागीय पोलिस अधिकारी बुलढाणा यांचे मारगदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संग्राम पाटील, डीबी पथकाचे ईंचार्ज पोऊनी नितीनसिंह चव्हाण, पोना अमोल गवई, पोकॉ राजेश मापारी, पंढरीनाथ मिसाळ, रोहिदास पंढरे, सागर कोल्हे, राहुल पायघन, निलेश साबळे, मपो कॉ रुपाली उगले, मपोहेकॉ माया सोनोने यांनी केली.