लग्न होत नसल्याने नैराश्यातून युवकाने उचले टोकाचे पाउल…
सोनाळा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- बुलढाणा जिल्हयात सातपुड्याच्या पायथ्याशी बावनबीर हे गाव आहे. येथील एका ३१ वर्षीय शेतमजूर युवकाने लग्न होत नसल्याने घरातच गळफास लावून जीवनयात्रा संपविल्याची खळबळजनक घटना मंगळवार २८ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली या आत्महत्येमूळे समाजातील आजचे धगधगते वास्तव समोर आल्याने समाजमन सुन्न झाले आहे. उपवर मुलांचे लग्न होत नसल्याने त्यांचे वय निघून जात असल्याने युवक मानसिक तणावाने वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलत आहेत.
याच कारणाने आत्महत्या केलेल्या शेतमजूर युवकाचे नाव संतोष शहादेव घाटोळे रा बावनबीर ता. संग्रामपूर असे आहे. तो आई वडीलाचा एककुलता एक मुलगा होता. या दुदैवी घटनेमुळे बावनबीर गावात एकच शोककळा पसरली आहे. या घटनेची फिर्याद सोनाळा पोलिस स्टेशनला मृतक युवकाचे वडील शहादेव पूर्णांजी घाटोळे यांनी दिली. यावरून पोस्टेला मर्ग क्र १२/२४ नुसार कलम १७४ जा. फौ. नुसार आकस्मिक गुन्हयाची नोंद घेण्यात आली आहे. फिर्यादीत नमूद असे की, लग्न होत नसल्याने वय निघून जात असल्याने व सतत लग्नाचा विचार येत असल्याने संतोष ने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. संपूर्ण कुटुंब शेतमजूरी करून उदरनिर्वाह चालवत आहे. गरिब परिस्थिती मुळे संतोषचा विवाह जूळत नव्हता. मृतक यास ३ विवाहित बहिणी आहेत. तर मृतक संतोष बांधकाम मजूरहोता. वडील परंपरागत माठ विक्रीचा व्यवसाय करतात. पुढील तपास पोहेकाँ विशाल गवई हे करित आहेत.