बेदम मारहाणीत तरुणाचा झाला मृत्यू….
मेहकर पोलिस स्टेशनला चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल
मेहकरः- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- शहरातील माळीपेठ मधील २२ वर्षीय तरुणास ३ ते ४ जणांनी २७ मे च्या उशीरा रात्री बेदम मारहाण केल्याने त्या तरूणाचा मृत्यू झाला असून याप्रकरणी मेहकर पोलिसांनी चार आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. शहरातील माळीपेठ मधील राजू ननवरे हे मरण पावलेल्या तरूणाचे वडील असून त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की २७ मेला दुपारी अंदाजे ४ वाजता गणेश किशोर थाबडे हा घरी आला व आकाश कुठे म्हणून आवाज देऊ लागला असता राजू ननवरे, त्यांची पत्नी व मुलगा सागर बाहेर आले असता आकाश कुठे त्याचा मी आज खून करणार आहे असे बोलून निघून गेला. रात्री साडेअकरा वाजता शेजारच्या सागर बामणे याने आकाशचा भाऊ पवन याला सांगितले की आकाशचा फोन आला होता. त्याला जानेफळ रोडवरील सैलानी तलावाच्या मागे मारहाण झाली आहे. पवन, सागर बामणे, रवी ननवरे, करण ननवरे हे आँटोने घटनास्थळी गेले असता त्यांना आकाशला मारहाण झालेली दिसले. त्यांनी आकाशला मेहकर ग्रामीण रूग्णालयात आणले मात्र ईथे काहीच सुविधा नसल्याने कर्तव्य करीत असलेल्या डॉ. नी बुलढाणा रेफर करायला सांगितले. मात्र पवन व मित्रांनी आकाशला अकोला करीता हलविले. रस्त्यात आकाशला कोणी मारले विचारले असता त्याने गणेश थाबडे व अन्य ३ जणांनी मारले असे सांगितले. अकोला सामान्य रुग्णालयात आकाशला डॉक्अर यांनी तपासून मृत घोषित केले.याप्रकरणी आकाशचे वडील राजू ननवरे यांनी मंगळवारी मेहकर पो. स्टे. ला तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपी गणेश थाबडे व अन्य ३ विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. प्रभारी उपविभागीय अधिकारी मनीषा कदम, पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी सकाळीच घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हाणामारी कशामुळे झाली याबाबत तक्रारी त काहीच उल्लेख नसला तरी अवैध सावकारीतून हत्या झाली अशी शहरात चर्चा आहे. तर आकाश व गणेश यांच्या विरोधात मेहकर पो.स्टे. ला याआधी गुन्हे दाखल असल्याचे समजले आहे.