दुकानातून २६ हजाराचा मोबाईल चोरट्याने केला लंपास
शेगाव- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी : येथील खेतान चौकातून अज्ञात इसमाने मोबाईल लंपास केल्याची घटना घडली.याबाबत नीतीन बद्रीप्रसाद अवस्थी वय ४२ वर्ष यांनी पोलिसात फिर्याद दिली की, एक अनोळखी इसम दुकानात आला व त्याने त्याचे जवळचे कागदपत्र मला दाखवले व मला काही पैशाची मदत करा असे मला म्हणाला त्यावेळी तो मला कागदपत्र दाखवत असतांना माझा सॅमसंग कंपनीच ए ३३ आकाशी रंगाचा मोबाईल ज्यामध्ये बीएसएनएल कंपनीचे सीम व जीओ कंपनीचे सीम ज्याचा आयएमईआय३५०९९५४१५८४८३०५ असलेला माझा मोबाईल की अं २५, ९९९/- माझ्या दुकानाचे काउंटर वर ठेवलेला होता. सदर अनोळखी इसम कागदपत्र दाखवुन भीक मागुन दुकानातुन निघून गेल्यानंतर मी माझे दुकानाचे काउंटर वर ठेवलेला माझा मोबाइल दिसून आला नाही.
तरी माझे दुकानात पैसे मागण्याकरीता आलेल्या अनोळखी इसमाने माझा वर नमुद वर्णनाचा मोबाइल चोरुन नेला आहे अशा फिर्यादी चे तोंडी रिपोर्ट वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.