स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात चोरी करणाऱ्या चोरट्यांना शहर पोलिसांनी अवघ्या दोन तासात ठोकल्या बेड्या
बुलढाणा:- आपला बुलढाणा जिल्हा बातमी: चोरट्यांनी आता तर हद्दच केली आतापर्यंत लोकांना त्रास देत होते मात्र आता तर देवांना सुद्धा चोरट्यांनी सोडली नाही. असाच एक प्रकार बुलढाणा शहरात घडला आहे सरस्वती नगर येथे असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराज केंद्रात चोरट्यांनी हात घातला व हजारो किमतीचे मुद्देमाल लंपास केला ही घटना 2 जून रात्री 8:30 ते 3 जून सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी स्वामी समर्थ केंद्राचे अध्यक्ष शांताराम लक्ष्मण जंजाळकर यांनी 3 जून रोजी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीनुसार स्वामी समर्थ महाराज केंद्रातील स्वामी समर्थ महाराजांची पितळ्याची 4 किलो वजनाची मूर्ती किंमत 12 हजार रुपये, अष्ट धातूची महादेवाची पिंड साडेचार किलो वजनाची किंमत 13 हजार रुपये, चांदीचे वीस तोळे वजनाचे झुंबर किंमत 22 हजार रुपये, अष्ट धातूच्या दोन हत्तीच्या मुर्त्या किंमत 2 हजार रुपये, गाईची अष्टधातूची मूर्ती किंमत 1000 रुपये, पितळी घंटा 500 रुपये, पितळे तीर्थ जरी चार किलो वजनाचे किंमत 3 हजार रुपये, तांब्याची संध्या पत्र किंमत 1 हजार रुपये, तांब्याचे दोन गडवे 500 रुपये, स्टीलचे दोन ताट किंमत 200 रुपये असा एकूण 55 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला होता. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे, व बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे हे घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण करून घटनेची सविस्तर माहिती जाणून घेऊन परिसरातील लोकांना विचारपूस करून गोपनीय यंत्रणा कार्यान्वित केली व अवघ्या दोन तासात स्वामी समर्थ महाराज केंद्रात चोरी करणाऱ्या त्या चोरट्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्यायातील चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.