Homeक्राईम डायरीबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई चोरी गेलेल्या 73 मोबाईलचा लावला शोध

Spread the love

 

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- चोरट्याने सर्वच ठिकाणी धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन परिसरात भरणाऱ्या आठवडी बाजारात भर दिवसा मोबाईल हरवल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. सदर घटनेकडे जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सदर घटनेची गांभीरतेने दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांना तांत्रिक विश्लेषण विभाग सायबर लॅब यांच्याकडून जिल्हा पोलीस घटकात हरवलेल्या गहाळ झालेल्या मोबाईल संबंधित ची माहिती प्राप्त करून घेतली व मोबाईलचा शोध घेण्याचा आदेश सुद्धा जाहीर केला.

स्थानिक गुन्हे शाखेने या तपासात गती वाढवली. पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी पो.हे.का. गजानन माळी,पो.काॅ. सुभाष वाघमारे यांचे पथक तयार करून तांत्रिक विश्लेषण विभाग सायबर लॅब बुलढाणा यांच्याकडून मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे सदर पथकाने जिल्ह्यातील तब्बल 73 चोरी गेलेल्या मोबाईलचा तपास लावला.

स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केलेले मोबाईल संबंधित मूळ मालकास परत करण्याच्या हेतूने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय बुलढाणा येथे मोबाईल वाटप संदर्भातील विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या हस्ते मोबाईल संबंधित मूळ मालकास परत करण्यात आलेले आहे.

ही धडाकेबाज कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने व अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास कुमार सानप पो.हे.काॅ गजानन माळी,पो.काॅ. सुभाष वाघमारे, तांत्रिक विश्लेषण विभाग सायबर लॅब चे राजू आडवे, पवन मखमले, कैलास ठोंबरे, ऋषिकेश खंडेराव, उषा वाघ यांच्या पथकाने मोबाईलचा शोध घेऊन 73 गहाळ झालेल्या मोबाईल विविध ठिकाणाहून एकत्र तर मूळ मालकास परत करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे.

 

 

असा मिळवावा आपला हरवलेला मोबाईल परत

नागरिकांनी त्यांचे मोबाईल हरवल्यास गहाळ झाल्यास किंवा चोरी केल्यास जवळील पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवावी, जे सिम कार्ड चालू आहे ते ब्लॉक करावे व त्याच नंबरचे दुसरे सिम कार्ड सुरू करून घ्यावे व तेच सिमकार्ड CEIR वर रजिस्ट्रेशन करिता वापरावे, https://www.ceir.gov.in/Home/index.jsp या वेबसाईटवर संपर्क साधावा,Block Stolen/Lost Mobile यावर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरावी व Submit वर क्लिक करावे, ही कागदपत्रे सोबत जोडावी सॉफ्ट कॉफीची साईज 500 केबी पेक्षा कमी असावी पोलीस स्टेशनला केलेली तक्रार प्रत, मोबाईल खरेदी बिल, कोणतेही शासकीय ओळखपत्र, यावर आपल्याला तक्रार नोंदवल्याचा रिक्वेस्ट नंबर मिळेल, हरवलेला मोबाईल ऍक्टिव्ह ऑन झाल्याची माहिती पोर्टल द्वारे रजिस्टर मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे मिळेल व सदरची माहिती पोलीस स्टेशन येथे कळवावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page