बुलढाणा लोकसभा निवडणुकीत प्रतापराव जाधव यांचा विजय
विजयाचा जल्लोष साजरा करत बुलढाणा शहरात गुलाल उधळत काढली मिरवणूक
बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- संपूर्ण देशाचा लोकसभेचा निकाल आज जाहीर झाला यामध्ये बुलढाणा लोकसभा निवडणुकीमध्ये प्रतापराव जाधव यांचा विजय झाला आहे. आज सकाळपासून मतमोजणी सुरुवात झाली होती. सुरुवातीपासूनच प्रतापराव जाधव हे आघाडीवर होते. शांतता ठेवून सुद्धा विजय मिळवल्या जातो हे अखेर प्रतापराव जाधव यांनी दाखवून दिले.
मतदान झाल्यानंतर जो तो उमेदवार आपल्या विजयाचे दावे करत असताना प्रतापराव जाधव हे मात्र शांत होते उद्धव ठाकरे च्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर हे विजय होणार अशी सुद्धा चर्चा जिल्ह्यामध्ये रंगत होते मात्र त्यांना या निवडणुकीत यश मिळवत्या आले नाही प्रतापराव जाधव यांनी 3 लाख 48 हजार 238 एवढी मते घेत 29 हजार 376 मतांची आघाडी घेत विजय मिळवला आहे. विजयानंतर प्रतापराव जाधव यांची बुलढाणा शहरात जंगी विजयाची मिरवणूक काढण्यात आली प्रतापराव जाधव यांच्या अंगावर गुलालाची व फुलालाची उधळण करण्यात येत आहे तर शिवसैनिक डीजे च्या तालावर नाचत आहे यावेळी बाप तो बाप रहेगा या गाण्यावर विजयी मिरवणुकीत शिवसैनिकांनी चांगलाच ठेका धरत तुफान घोषणाबाजी केली.