जागतिक पर्यावरण दिनाच्या काळातच मेरा अंत्रीखेडेकर कवठळ शिवारात अवैद्य वृक्षतोड
चिखली – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी – एकनाथ माळेकर- चिखली तालुक्यातील मौजे मेरा अंत्रीखेडेकर कवठळ शिवारात पर्यावरण दिनाच्या काळातच एक नवे दोन नवे तब्बल चार व्यापारी हे अवैद्य वृक्ष तोड करीत आहे याची भनक सुद्धा वनपाल यांना लागत नाही वनपाल हे या भागात नोकरी करतात की त्यांच्या ऑफिस व घरीच नोकरी करतात हा मोठा प्रश्न या भागातील वृक्षप्रेमी लोकांना पडलेला आहे वनपाल हे या भागांमध्ये कधीही दिसत नसल्यामुळे सदर व्यापारी यांची मजुरी वाढली आहे आणि या तीन गावांमध्ये सुज्ञ नागरिकांच्या असे लक्षात आले आहे की जागतिक पर्यावरण काळामध्येच या भागांमध्ये चार ठिकाणी अवैध्य वृक्ष तोडत असल्याचे वृक्ष वर प्रेम करणाऱ्या लोकांनी या भागाचे वनपाल श्री पठाण यांना दूरध्वनीवरून सांगितले परंतु सर्व लोकांना चार ठिकाणी अवैध्य वृक्ष लागवड करताना दिसले परंतु या भागाच्या वनपाल अधिकारी यांना या भागातील अवैद्य वृक्ष लागवड तोडताना दिसले नाही हे विशेष उल्लेखनीय आहे वनपाल हे या भागांमध्ये येऊनही सुद्धा पाहत नाहीत भरपूर लोकांना या भागाचे वनपाल कोण आहे हे सुद्धा माहित नाही वनपाल हे फक्त कागदपत्रे विजिट करतात असे असल्याचे दिसून येत आहे या भागांमध्ये वन्य प्राणी सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी भटकतात काही दिवसापूर्वीच कवठळ या ठिकाणी एक माकड हे विहिरीत पडले होते त्यावेळेस सुद्धा या भागाचे वनपाल व जे अधिकारी ज्या अधिकाऱ्याची यासाठी निवड केली आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी येवुन सुद्धा पाहिले नाही त्यांनी एक प्रायव्हेट माणूस पाठवून माकड हे विहिरीतून बाहेर काढले सदर माकडाला हाताला व पायाला बऱ्याच जखमी झाल्या असल्याचे प्रथमदर्शनी स्थानिक लोकांनी सांगितले परंतु त्या ठिकाणी वन विभागाचे कोणतेही कर्मचारी हजर नसल्यामुळे सदर माकडावर कोणत्याही प्रकारचा इलाज न करताच माकड कळपामध्ये सोडून दिले वनविभागाचे कोणतेही कर्मचारी या भागांमध्ये येऊन सुद्धा पाहत नाही आज वन्यप्राणी हे पाण्यासाठी भटकत आहेत परंतु त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही त्यामुळे काही वन्यप्राणी हे विहिरीमध्ये पडून जखमी होत आहे त्यावर कोणत्याही प्रकारचा वनविभागाचे कर्मचारी इलाज करत नाहीत व येऊन सुद्धा पाहत नाही त्यांच्यामार्फत कोणालातरी थोडेफार पैसे देऊन त्या त्यांची विल्हेवाट लावण्यास सांगतात परंतु त्यांना कोणत्याही प्रकारची इलाज करण्यासाठी वन विभागाचे कोणतेच कर्मचारी त्रास घेत नाही वन कर्मचारी फक्त हे कागदपत्रे नोकरी करीत आहेत त्यांना दूरध्वनीवरून सांगितले असता ते उडवडीचे उत्तर देतात वन विभागाचे कर्मचारी फक्त ज्यावेळेस रोयापासूनचे नुकसान होते त्याच कामांमध्ये वनविभागाचे कर्मचारी तत्परता दाखवतात त्यामध्ये सुद्धा त्यांनी स्पेशल मध्ये एजंट लोक नेमले आहेत त्यामध्ये ते अर्ध्या तुम्ही आणि अर्ध्यात आम्ही अशी भूमिका वनविभागाची दिसून आली आहे आज शासन वृक्ष लागवडीसाठी करोडो रुपये खर्च करीत आहेत आणि पर्यावरणाचा जो होणारा रास आहे तो वृक्ष थोडी मुळेच होत आहे याची थोडीशी सुद्धा भनक वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिसून येत नाही ते फक्त आपल्या घरून फोनवर सांगतात की या भागांमध्ये वृक्ष वृक्षतोड ही होत नाही सर्व लोकांना वृक्ष तोडताना दिसतात परंतु वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना वृक्षतोड ही दिसत नाही का ज्यांच्यावर त्याची जबाबदारी दिली आहे तेच जर असे मूंग गळून गप्प बसले तर या भागातील जंगल थोड्या दिवसांमध्ये नष्ट होऊन वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही जर हे जंगलतोड अशी सुरू राहिली तर याचा परिणाम माणसावर सुद्धा होणार आहे आज तपमान एवढं वाढला आहे त्याला कारणीभूत फक्त ही जंगल तोड आहे आणि प्राणी आणि वनस्पती जे प्राणी जंगलात राहतात ते आज गावामध्ये वास्तव्यात दिसून येत आहे याचा स्थानिक लोकांवर विपरीत परिणाम होत आहे जंगलतोडीमुळे जमिनीची धूप होऊन वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही सदर वृक्षतोडीची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेताच व्यापारी हे वृक्षतोड करीत आहे लोकांना सुद्धा वन खात्याचे कोणत्याही प्रकारची दाक राहीला नाही त्यामुळे कोणीही बिगर परमिशन हे झाडे तोडत आहे सदर झाडे तोडीचा माणसावर परिणाम झालेला आहे काही दिवसापूर्वीच माणसाला ऑक्सिजन कमी मिळाल्या मुळे कोरोना सारख्या महामारीने आपले डोके वर काढले होते त्यावेळेस ऑक्सिजनची गरज किती आहे हे सर्वसामान्य जनतेला कळाले आहे ऑक्सीजन देणे हेच कार्य झाडाच्या पानांमधून होते त्यामुळे वृक्ष तोड जर ही अशी चालू राहिली तर येणाऱ्या काळामध्ये या भागांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासेल आणि येणारा पाऊस सुद्धा या भागामध्ये पडणार नाही कारण येणारे ढग जर सरळ समोर गैले तर या भागामध्ये पाऊस पडणार नाही आणि हा भाग वाळवंट होण्यास जास्त दिवस लागणार नाहीत तरी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी या विभागाचे वनपाल यांना समज देऊन आपले कर्तव्य काय आहे याची जाण करून द्यावी अशी मागणी सुद्धा या भागातील वृक्षप्रेमी लोक करीत आहे जर हे वृक्षतोड थांबली नाही तर थोड्याच दिवसांमध्ये वृक्षप्रेमी लोक आंदोलनाचा विचार करून सदर वनपाल यांना बडतर्फ करण्याची मागणी सुद्धा वन संरक्षक फॉरेस्ट अधिकारी बुलढाणा यांच्याकडे करणार असल्याची चर्चा या भागातील लोकांमधून दिसून येत आहे. सदर माहिती वन संरक्षक फॉरेस्ट अधिकारी बुलढाणा गवस मॅडम यांना दूरध्वनीवरून माहिती दिली असता त्यांनी ताबडतोब मोबाईल टिम यांना माहिती दिली व लवकरच झालेल्या अवैध वृक्षतोडीची चौकशी करण्यात येईल असे दूरध्वनीवरून उपवन संरक्षक फॉरेस्ट अधिकारी बुलढाणा गवस मॅडम यांनी सांगितले आहे