डॉक्टर व पोलीस सांगून महिलेची काढली छेड
दोघांवर विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा
खामगावः- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- पतीघरी नसताना रात्री विवाहितेच्या घरी जाऊन डॉक्टर व पोलीस असल्याची बतावणी करत विवाहितेचा हात धरून ओढाताण करूनच छेड काढली व अश्लिल शिवीगाळ करून पतीचे अपहरण करण्याची आणि हातपाय तोडण्याची धमकी दिली. अशा तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी तोतया डॉक्टर व पोलीसा विरुद्ध विनयभंगासह विविध कलमान्वय गुन्हे दाखल केले आहेत गुन्हे दाखल करण्याची कारवाई ३० मे रोजी करण्यात आली आहे.
याबाबत स्थानिक रेल्वेगेट वामन नगर भागात राहणाऱ्या विवाहितेने खामगाव शहर पोस्टेला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,
२७ मे रोजी रात्री ८ वाजता माझे पती घरी नसताना आकाशवासुदेव इंगळे वय ३० राहणार भालेगाव बाजार व नितीन बाबुराव सूर्यवंशी वय ३३ राहणार तांदुळवाडी तालुका खामगाव हे दोघे संगनमत करून घरी आले व त्यांनी मला तुझे पती कुठे आहेत. अशी विचारणा केली. त्यावेळी मी त्यांना माझे पती बाहेरगावी गेल्याचे सांगितले. त्यावेळी आरोपी आकाश व नितीन यांनी अनुक्रमे डॉक्टर व पोलीस असल्याची खोटी बतावणी करून त्यांनी वाईट उद्देशाने माझा हात पकडून ओढताण करून माझा विनयभंग केला. एवढ्यावरच ते थांबले नाही तर त्यांनी तुझ्या पतीचे एखाद्या दिवशी अपहरण करून त्याला गायब करू असे म्हणत मला व माझ्या पतीला अश्लिल शिवीगाळ केली कुऱ्हाडीने हातपाय तोडण्याची धमकी देत दोघांविरुध्दही अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून तुम्हाला खोट्या केसेस मध्ये अटकवू अशी धमकी दिली.
आमचे पोलीस अधिकारी चांगल्या ओळखीचे आहेत ते आम्हाला काहीही करणार नाहीत असे म्हणून धमकाविले. आरोपी आकाश इंगळे व नितीन सूर्यवंशी हे दोघेही गुंड व गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचे पीडितेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी कलम ३५४अ, २९४, ५०६, ३४ भादविचा गुन्हा दाखल केला आहे.