धुऱ्याच्या वादातून दोन गटात हाणामारी !
परस्परविरोधी तक्रारींवरून गुन्हा दाखल
खामगाव :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- शेतीच्या धुन्ऱ्याच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. ही घटना खामगाव तालुक्यातील वर्णा येथे बुधवारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल केले आहे.
कपिल गोपाल इंगळे यांनी हिवरखेड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यामध्ये संजय शालिग्राम इंगळे, भारती संजय इंगळे, शालिग्राम इंगळे, विकी राजू इंगळे, लकी इंगळे, मैनाबाई राजू इंगळे, राजू इंगळे यांच्या शेताचा धुरा जवळजवळ आहे. या धुऱ्यावर कपिल इंगळे यांनी दगड टाकले. या कारणावरून संबंधित सात जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून कपिल पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांन काठीने मारहाण करून अश्लील शिवीगाळ केली. तसेच जिवे मारण्याच धमकी दिल्याचा आरोप केला. या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी सात जणांविरेधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान ३४ वर्षीय भारती संजय इंगळे यांच्या तक्रारीवरूनही दुसऱ्या गटातील कुणाल गोपाल इंगळे, कपिल् गोपाल इंगळे, गोपाल पुंडलिक इंगळे या तिघांविरोधात गैरकायद्याची मंडळ जमवून शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी हिवरखेड पोलिसांन गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास् हिवरखेड पोलिस करीत आहेत.