वीज तारेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू
बीबी :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- लोणार तालुक्यातील मांडवा येथील फरान खॉ सुभान खॉ पठाण यांचा ५ जून रोजी दुपारी वाजण्याच्या दीड सुमारास खाली लोंबकळलेल्या विद्युत तारेचा शॉक लागून मृत्यू झाला. मांडवा शिवारातील गट नंबर ३१९ मध्ये असलेल्या प्रकाश आसाराम वाघ यांच्या शेतशिवारात ही घटना घडली.पेरणीचे दिवस जवळ आल्याने शेतीच्या मशागतीला सुरुवात झाली आहे. फरान खॉ पठाण यांनी आपल्या शेताच्या शेजारी असलेल्या प्रकाश आसाराम वाघ यांच्या बैलगाडीत शेतात वखर पाळी घालण्यासाठी घरून वखर घेतला होता. बैलगाडी प्रकाश वाघ यांच्या गोठ्याजवळ उभी केली आणि गाडीतून वखर खाली उतरत असताना, फरान यांनी वखर खांद्यावर घेतला, तेव्हा वखराच्या लोखंडी दांडीचा खाली लोंबकळलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने त्यांना शॉक लागला. खरे तर एलेव्हन केवीची तार ही जमिनीपासून वीस फूट उंच असायला पाहिजे, परंतु ती कमी उंचवीर होती. दरम्यान फरानला दुचाकीवर बिबी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.