जिजामाता महाविद्यालयात शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त अभिवादन
बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती व्दारा संचालित स्थानिक जिजामाता महाविद्यालयात छत्रपती शिवाजी राजे भोसले महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रशांत कोठे यांचे मार्गदर्शनात इतिहास विभागाद्वारे आयोजित करण्यात आला.या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रशांत कोठे व इतिहास विभागाचे प्रा डॉ नामदेव ढाले यांनी ३५० शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मार्गदर्शन केले. शिवराज्याभिषेकाचे तत्कालीन परिस्थितील महत्व व आवश्यकता यासंबंधी मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांचे सार्वभौम, धर्मनिरपेक्ष राज्याची निर्मिती व त्याचा तत्कालीन राजकारणातील प्रभाव यासंबंधी विस्तुत मार्गदर्शन केले.कार्यक्रमास आयक्युएसी चे प्रमुख प्रा सुबोध चिंचोले, कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख प्रा संजय सोनुने, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा डॉ सुरेश गवई, कला शाखेचे प्रमुख प्रा डॉ जे जे जाधव, डॉ. डी. जे. कांदे, तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.