आई फाउंडेशनच्या सचिव तथा सामाजिक कार्यकर्त्या जयश्रीताई बोराडे यांना झाशीची राणी पुरस्कार प्रदान
बुलढाणा:- आपला बुलढाणा जिल्हा बातमी- बुलढाणा येथील आई फाउंडेशनच्या सचिव तथा सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती जयश्रीताई बोराडे यांना झाशीची राणी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
संजीवनी बहुउद्देशीय संस्था केळवद द्वारा आयोजित सर्वजातीय सामूहिक विवाह सोहळा दि 6 जून 2024 रोजी चिखली येथील महाराजा अग्रसेन रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आला होता या सामूहिक विवाह सोहळ्यात 112 जोडप्यांनी विवाह बंधनाची गाठ बांधली आहे. तसेच ज्या व्यक्तींनी समाजाच्या हिताचे काम केले आहे अशा व्यक्तींना वेगवेगळे पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. यामध्ये बुलढाणा येथील आई फाउंडेशनच्या सचिव तथा सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती जयश्रीताई बोराडे यांना त्यांनी केलेल्या विधवा तसेच एकल महिलांच्या कार्यासाठी आणि त्यांचे पुनर्वसनासाठी केलेला कार्याची दखल घेऊन संजीवनी बहुउद्देशीय संस्था केळवद या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून श्रीमती जयश्री ताईंना झाशीची राणी हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले आहे यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते