जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या पथकाने जिल्ह्यातील व शहरातील सोनोग्राफी सेंटर एमटीबी सेंटर व खाजगी रुग्णालयाची केली तपासणी
जिल्ह्यात व शहरात कुठे गर्भपात व लिंगभेद तपासणी आढळून आल्यास संपर्क साधावा जिल्हा शल्य चिकित्सक यांची आव्हान
बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- बुलढाणा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या पथकाने जिल्ह्यातील व शहरातील सोनोग्राफी सेंटर एमटीबी सेंटर व खाजगी रुग्णालयाची तपासणी मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम 1जून 2024 रोजी सुरू करण्यात आली आहे.
या मोहीम पथकामध्ये 3 टीम तयार करण्यात आली आहे. या तिन्ही टीम जिल्ह्यातील व शहरातील सोनोग्राफी सेंटर एमटीबी सेंटर तपासणी करत आहे यामध्ये एक जून रोजी सहा सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यात आली आहे. यासोबतच सहा एमटीबी सेंटर सुद्धा तपासण्यात आले आहे. प्रायव्हेट हॉस्पिटल बॉम्बे नर्सिंग ॲक्ट प्रमाणे शासनाच्या गाईडलाईन प्रमाणे नीट व्यवस्थित सुरू आहे की नाही याची सुद्धा तपासणी केली आहे यामध्ये खाजगी रुग्णालयामधील दहा रुग्णालयाची तपासणी करण्यात आली आहे. सदर घटनेचा अहवाल आलेला असून त्या अहवालाचा नीट काळजीपूर्वक अभ्यास करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे यामध्ये बरेच हॉस्पिटल हे स्वच्छतेच्या बाबतीत निष्काळजीप्रमाणे दिसून आले आहे. रुग्णाच्या दोन पलंगांची शासनाच्या नियमाप्रमाणे जे अंतर असायला हवे ते दिसून आले नाही. काही खाजगी वैद्यकीय अधिकारी हे प्रायव्हेट प्रॅक्टिस करत असल्याचे काही ठिकाणी आढळून आले आहे. त्यांच्यावर शासनाच्या नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार असून त्यांचा प्रस्ताव हा पुढे शासनाला पाठविण्यात येणार आहे. सोनोग्राफी सेंटर हे काही चेक झाले असून तर काही बाकी आहे त्याची तपासणी सुद्धा सुरू आहे मात्र यामध्ये लिंग भेद असल्याचे कुठे आढळून आले नाही. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व जिल्हा वासियांना जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की जिल्ह्यात व शहरात कुठल्याही सोनोग्राफी सेंटरवर किंवा इतर ठिकाणी कुठेही लिंगभेद तपासणी किंवा गर्भलिंग निदान आढळून आल्यास आम्हाला त्वरित कळवावे त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करण्यात येणार आहे असे आव्हान त्यांनी यावेळी केले आहे