खासदार प्रतापराव जाधव घेणार मंत्री पदाची शपथ….
बुलढाणा :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- बुलढाणा जिल्ह्याचे स्वप्न आज अखेर पूर्ण झाले आहे जिल्ह्याचे भूमिपुत्र सलग तीन वेळा आमदार व चौथ्यांदा खासदार झालेले प्रतापराव जाधव यांची आता केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागण्याचे निश्चित झाले आहे. संपूर्ण जिल्ह्यात शिवसैनिकांकडून जल्लोष करण्यात येत आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील जनतेचा हा विजय असल्याची त्यांनी म्हटले आहे केंद्रीय मंत्री पदाचा उपयोग भारत मातेला वैभववाच्या शिखरावर नेण्यासाठी तळागाळातील सामान्य जनतेची सेवा करण्यासाठी करणार असल्याची त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आज सायंकाळी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात खासदार प्रतापराव जाधव मंत्री पदाची शपथ घेणार असल्याची वर्णी लागण्याचे निश्चित झाले आहे.
असा राहिला त्यांचा राजकीय काळ संघटनात्मक कार्यामध्ये त्यांनी 1986 मध्ये मेहकर तालुक्यांमध्ये शिवसेनेची स्थापना केली 1986 ते 1988 मध्ये तालुका संघटक तर 1988 ते 1990 मध्ये तालुकाप्रमुख व 1990 पासून बुलढाणा जिल्हा शिवसेनाप्रमुख म्हणून त्यांनी कार्य केले जिल्ह्यामध्ये 100 शाखा स्थापनेमध्ये प्रत्यक्ष सहभाग त्यांचा आहे 2014 ते 2021 शिवसेना संपर्कप्रमुख तर 2021 ते आज तयागत शिवसेना नेते महाराष्ट्र राज्य असा त्यांचा काळ आहे
राजकीय वाटचाल
1988 ते 1992 मेकर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तर 1992 मध्ये जिल्हा परिषद सदस्य 1993 मध्ये मेकर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती. 1900 मेकर विधानसभा मतदारसंघात त्यांनी निवडणूक लढवली होती मात्र त्या निवडणूक मध्ये ते पराभूत झाले तरी पुन्हा जोमाने लढून 1995 मध्ये मेहकर विधानसभा मतदारसंघात त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. 1997 ते 1998 या काळात क्रीडा पाटबंधारे राज्यमंत्री अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री पद त्यांनी संभाळलेले आहे. परत 1999 आणि 2004 या दोन्ही काळात त्यांनी मेहकर विधानसभा लढवली यामध्ये ते परत विजय झाले अशा प्रकारे ते तीन वेळा आमदार झाले. 2009 मध्ये पहिल्यांदा बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून त्यांचा विजय झाला 2009, 2014, 2019, तीन वेळ खासदार झाले आहे आणि आता परत 2024 मध्ये चौथ्यांदा खासदार झाले आहे 2019 ते 2022 या काळात ग्रामविकास व पंचायत राज समिती अध्यक्ष म्हणून ही जबाबदारी पार पाडली.
खासदार प्रतापराव जाधव यांनी केलेले सामाजिक कार्य
मेहकर पंचायत समिती मध्ये सहापैकी तीन शिवसेना जिल्हा परिषद सदस्य, हिंदू धर्मियांचे वैदिक पद्धतीने सामूहिक विवाह सोहळे दोन वेळा समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम राबविले, शिवसेना कार्यालय मेहकर माध्यमातून गरजूंना रक्तपुरवठा करणे, रोग निदान शिबिराचे आयोजन करून ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांना वैद्यकीय मदत, शेतकरी शेतमजूर व ग्रामीण भागाच्या समस्या सोडविण्याकरिता अनेक आंदोलन केलीत व तीन वेळा कारावास भोगला, धर्मवीर स्व. दिलीपराव रहाटे बहुउद्देशीय स्मारक समिती स्थापन करून त्या माध्यमातून गरिबांना आर्थिक शैक्षणिक सहाय्य, अनेक गावात शिवसैनिकांच्या मदतीने श्रमदानाचे कार्यक्रम घेऊन गाव सुधारण्याचे प्रयत्न, आमदार म्हणून मेहकर मतदार संघाच्या विकासाच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्नशील आहेत, महाराष्ट्र अर्बन को ऑफ सोसा मेहकर द्वारे स्व पंजाबराव जाधव आरोग्य सहायता निधी गरजूंना उपचारासाठी मदत, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र अर्बन को ऑफ सोसा मर्या अंतर्गत नैसर्गिक आपत्ती अस्मानी व सुलतानी संकट काळी गरजूंना अर्थसहाय्य इतर मदत, कोविड काळात स्वतःच्या संस्थेत खाजगी दवाखाना उभारून कोरोनासह इतर आजारावर मोफत उपचार शैक्षणिक सामाजिक क्रीडा व महिला सक्षमीकरण धोरणात उल्लेखनीय कामगिरी असा त्यांचा सामाजिक कार्यकाळ आहे व यापुढे सुद्धा करत राहणार