आरटीओची वाहन तपासणी मोहीम
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी: उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे वाहन तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. यात नियमानुसार नसणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे.वाहन तपासणी पथकाद्वारे रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विना क्रमांकाची वाहने, वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने रस्त्यावर धावणारी वाहने, हेल्मेट परिधान न करता आढळून येणारी दुचाकी वाहने, तसेच फॅन्सी वाहन क्रमांक असणाऱ्या वाहनावर मोटार वाहन कायदा आणि नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे.
त्यामुळे वाहन चालविताना वाहन क्रमांक नियमानुसार असणे, वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवू नये. दुचाकी वाहने चालविताना हेल्मेटचा वापर करावा, फॅन्सी नंबरची वाहन चालवू नये. तसेच पालकांनी 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांना गिअरची वाहने चालवायला देवु नये. याबाबत कारवाई करण्यात येणार आहे. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी कळविले आहे.