शिंदी – चंदनपुर शिवारातील फुटलेल्या नादुरुस्त तलावाचे पाणी कोठे पाझरले ।
माती टाकून केलेल्या पाझर तलावाच्या निकृष्ट कामाची चौकशी करा उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्याकडे तक्रार
सिंदखेडराजा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- शिंदी व चंदनपुर शिवारातील सीमेवर पाझर तलावाची निर्मिती करण्यात आली होती या पाझर तलावामुळे २५ हेक्टर शेतजमीन पाण्याखाली येणार होती,परंतु संबंधित ठेकेदार व अधिकारी यांनी संगणमत करून पाझर तलावाची जी भिंत आहे त्या भिंतीवर फक्त काळी मातीचा थर टाकला होता कुठल्याही प्रकारची दबई केल्या गेली नसल्यामुळे सदर बाजार तलाव 20 सप्टेंबर 2020 साली फुटला होता यामध्ये 18 शेतकऱ्यांचे पिके खरडून गेली होती त्यांना आज पर्यंत एकही रुपयाची मदत शासनाने दिली नाही,परंतु चार वर्षे उलटले तरी सुद्धा जलसंधारण विभागाच्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी या फुटलेल्या बाजार तलावाकडे ढुंकून सुद्धा बघितले नाही ? त्यामुळे सदर पाझर तलावाच्या नावाखाली किंवा दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये हडप केल्याची शंका उपस्थित होत आहे या पाझर तलावाकडे कुठल्याही कर्मचारी लक्ष देण्यासाठी पुढे येत नसून तलाव फुटण्याच्या अगोदर सुद्धा शेतकरी बांधवांनी कर्मचाऱ्यांना सूचना दिली होती त्यामुळे सदर नादुरुस्त पाझर तलावाच्या संबंधित सर्व कामाची चौकशी करून दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांची व ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन खंडारे यांनी उपविभागीय जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद देऊळगाव राजा यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे त्यामुळे लवकरात लवकर चौकशी लागून सत्य बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे