बालकांना दत्तक घेण्यासाठी सुधारीत नियमावली जाहीर
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- दत्तक विधान प्रक्रिया करण्यासाठी बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ आणि सुधारीत २०२१ व दत्तक नियमावली २०२२ नुसार दत्तक विधान प्रक्रिया राबविल्या जाते. बालकांना दत्तक घेण्यासाठी सुधारीत नियमावली जाहीर करण्यात आली आहे.नियमावलीनुसार बाळ दत्तक घेण्यासाठी भावी दत्तक माता ही शारीरिक, मानसिक, भावनात्मक आणि आर्थिक स्वरूपात सक्षम असणे आवश्यक आहे. सदर दत्तक विधान प्रक्रियेसाठी दोन्ही पती-पत्नी यांची सहमती असणे आवश्यक आहे. एका दत्तकसाठी बालक किंवा बालिका निवडू शकते, एकल पुरुष फक्त बालकाची निवड करु शकतात.
बाळ दत्तक घेण्यासाठीची पालकांची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. २ वर्षाच्या आतील बालकाला दत्तक घेण्यासाठी भावी दत्तक माता-पिता यांची कमाल वयोमर्यादा संयुक्तिक ही ८५ वर्ष आहे. तर एकल भावी माता-पिता यांची कमाल वयोमर्यादा ४० वर्षे आहे. २ से ४ वर्षापर्यतचे बालकासाठी अनुक्रमे ९० वर्षे आणि ४५ वर्षे आहे. ४ वर्ष ते ८ वर्षापर्यंतचे बालकांसाठी १०० वर्षे आणि ५० वर्षे वय असावे. ८ वर्ष ते १८ वर्षापर्यंतचे बालकांसाठी ११० वर्षे आणि 55 वर्षे असावे.
दत्तक विधानासाठी अर्ज करावा लागतो. दत्तक विधानामार्फत बाळ घेऊ इच्छिणाऱ्या भावी माता -पिता यांनी cara.wed.gov.in या पोर्टलवर अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष. सुवर्ण नगर, मुठ्ठे ले आऊट, बस स्टँडच्या मागे, डॉ. जोशी हॉस्पिटल शेजारी, बुलडाणा येथे भेट देऊ शकतात. तसेच यशोधाम, दि लव्ह ट्रस्ट, खामगाव रोड, सुंदरखेड, बुलडाणा या विशेष दत्तक संस्थेस भेट देऊन माहिती प्राप्त करु घेऊ शकतात. दत्तक विधानासाठी अर्ज केल्यानंतर गृह अध्ययन अहवालासाठी अर्जदारांना निकटची दत्तक संस्था निवडावी लागते, सदर अर्ज केल्यानंतर गृह अद्ययन अहवाल करण्यासाठी सदर संस्थेने ६० दिवसाच्या आत अर्जदाराच्या घरी जाऊन अहवाल तयार करणे बंधनकारक आहे. सदर गृह अद्ययन अहवाल हा ३ वर्षांसाठी लागू राहिल. दत्तक विधान संस्थेमार्फत गृह असायन अहवाल हा कारा पोर्टलवर अपलोड केल्यानंतर एक महिन्यानंतर आपल्याला आपल्या पसंतीनुसार बाळ दिसणे सुरु होते. ज्यामध्ये बाळाचा फोटो, मेडीकल रिपार्ट, बालक अभ्यास अहवाल असते. बाळ आपणास पसंत पडल्यास बालकास ४८ तासाच्या आत कारा पोर्टलवर आरक्षित करावे लागते. त्यानंतर सदर भावी माता-पिता यांची दत्तक विधान समिती बैठकीत साक्षात्कार आणि आकलन केल्यानंतर भावी माता-पित्ता हे बालकांसाठी योग्य वाटल्यास बालक पालकांच्या ताब्यात तात्पुरत्या स्वरुपात प्रि-फॉस्टर केअर अंतर्गत दिले जाते. संस्थेमार्फत सदर बालक व पालकांची नस्ती तयार करुन न्यायालयामार्फत पालकांना दत्तक आदेश दिला जातो.