Homeबुलढाणा (घाटावर)बुलढाणा घाटाखाली

बाल विकास धोरणाबाबत सूचना, हरकती आमंत्रित

Spread the love

बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्‍हा बातमी- महिला व बाल विकास विभागातर्फे सुधारीत बाल धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. याबाबत सूचना आणि हरकती असल्यास नागरिकांनी त्या सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. महिला व बाल विकास विभागांतर्गत बाल धोरणाचा प्रारुप मसुदा तयार करण्यासाठी तज्‍ज्ञ व्यक्ती व शासनाचे अधिकारी यांची समिती गठित करण्यात आली. समितीने महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा २०२२ मसुदा तयार केला आहे. सदर प्रस्तावित बाल धोरण आणि महाराष्ट्र शासनाचे कृती आराखडा २०२२ हा इंग्रजी व मराठी भाषेमध्ये womenchild.maharashtra.gov.in आणि wcdcommpune.com संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. प्रस्तावित बाल धोरण इंग्रजीमध्ये तयार करण्यात आले असून त्यांचे मराठीत भाषांतर करण्यात आले आहे.

या बाल धोरण आणि कृती आराखड्यामध्ये आवश्यक बाबी, सुचना, सुधारणा, तसेच मराठी भाषेतील भाषांतरीत मसुद्यामध्ये शब्द रचना, व्याकरणाबाबत हरकती व सूचना नागरिकांकडून मागविण्यात आल्या आहेत. प्रस्तावित महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा २०२२ च्या संदर्भाने नागरिकांच्या हरकती आणि सुचना दि. ३० जुन २०२४ पर्यंत महिला व बाल विकास आयुक्तालय, २८ राणीचा बाग, जुन्या सर्किट हाऊस जवळ, पुणे १ या पत्त्यावर अथवा childpolicy@gmail.com या ई-मेलवर पाठविण्यात याव्यात, असे आवाहन महिला व बाल विकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page