भगवान धन्वंतरीची विधीवत पुजा करून आयुष मंत्रालयांचा पदभार नामदार प्रतापराव जाधव यांनी स्विकारला …
बुलढाणा-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- भगवान धन्वंतरीची विधीवत पुजा करून देशातील नागरीकांना निरोगी आरोग्य लाभु देव अशी धन्वतरी चरणी प्रार्थना करून भारताच्या आयुष मंत्रालयांचा पदभार नामदार प्रतापराव जाधव यांनी आज स्विकारला …
दिल्ली येथील आयुष मंत्रालयात असलेल्या भगवान धन्वंतरी प्रतिमेची विधीवत पुजा नामदार प्रतापराव जाधव आणि राजश्री जाधव यांनी आज 11 जुन रोजी केली त्यांनतर आयुष मंत्रालयाचा पदभार नामदर प्रतापराव जाधव यांनी स्विकारला यावेळी आयुष मंत्रालयाचे सचिव वैदयराज कोटेचा संयुक्त सचिव भावना ससेन्सा उपस्थित होत्या. योगाच्या माध्यमातून निरोगी आयुष्यची देण मणुष्याला मिळल्याने योगाचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे आज विदेशातील लोक सुद्धा निरोगी आयुष्यसाठी योग साधना नियमित करता एवढ महत्व योगाला आहे भारतात योग, आयुर्वेदच्या माध्यमातून चांगल आणि गुणात्मक काम करणार असल्याच आयुष्य राज्यमंत्री ( स्वतंत्र प्रभार ) प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केल ..पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येणाऱ्या 100 दिवसाचं रोड मॅप करण्यात आला असून त्यामध्ये विकासात्मक दृष्टिकोनातून जनतेला सेवा देण्यात येणार आहे यामध्ये आयुष मंत्रालयाचे सुद्धा योगदान मोठ्या प्रमाणावर राहणार असून त्यासाठी आम्ही तयार असल्याची प्रतिक्रिया ही केंद्रीय आयुष राज्यमंत्री ( स्वतंत्र प्रभार )प्रतापराव जाधव यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले