सायबर पोलिसांची यशस्वी धडाकेबाज दमदार कामगिरी
ऑनलाइन फसवणूक झालेल्या व्यक्तीला सायबर विभागाने त्याची रक्कम परत मिळवून दिली
बुलढाणा:-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- वारंवार पोलीस प्रशासन आव्हान तसेच माहिती देत असते या फसवणूकला कोणी बळी पडू नका व काही नियम पाळायचे सांगत असतात तरी मात्र काही या फसवणे केला बळी पडतात. ऑनलाइन मध्ये फसवणूक करून तब्बल दोन लाख रुपये लंपास करणाऱ्या त्या भामट्या चोराला सायबर विभागाने पकडले आहे. सायबर विभागाची ही धडाकेबाज यशस्वी कामगिरी राहिली आहे.
22 फेब्रुवारी 2024 रोजी विजय रामचंद्र हिवरे रा देऊळगाव राजा हे आपले दैनंदिन कामकाज करत असताना त्यांच्या मोबाईलवर एक अज्ञात व्यक्तीने एक लिंक पाठवली त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर विजय हिवरे यांना यांना एक ओटीपी आला तो ओटीपी अज्ञात व्यक्तीबरोबर शेअर करतात चोरट्याने विजय हिवरे यांचे खात्यातील एकूण 2 लाख 35 हजार रुपये लंपस केले. सदर प्रकार विजय हिवरे यांच्या लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस स्टेशन गाठले व सायबर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. सायबर पोलिसांच्या पथकाने सदर प्रकरणात एनसीसीआरपी पोर्टलवर माहिती अपलोड करून फिर्यादीचे 2 लाख 35 हजार रुपये पैकी 2 लाख 25 हजार रुपये गोठून दि 13 मे 2024 रोजी फिर्यादी यांचे अकाउंट मध्ये 2 लाख रुपये जमा करण्यात आले आहे तसेच 25 हजार रुपये हे फिर्यादी यांना परत मिळवून देण्याकरिता कोर्ट प्रोसिजर करून फिर्यादी यांना त्यांचे उरलेले पंचवीस हजार रुपये परत करण्याकरता सायबर पोलीस स्टेशन प्रयत्न करीत आहे अशाप्रकारे जनसामान्याबरोबर सायबर फ्रॉड झाल्यास आपली तक्रार तत्काळ NCCRP या पोर्टलवर नोंदविण्याचे सायबर पोलिसांकडून आव्हान करण्यात येत आहे.
ही धडाकेबाज कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी,पो.हे.काॅ शकील खान, पोलीस नाईक राजदीप वानखेडे, विकी खरात, दीपक जाधव, महिला पो.काॅ संगीता अंभोरे यांनी केली आहे