Homeक्राईम डायरीबुलढाणा घाटाखाली

२१ वर्षीय युवतीचा विनयभंग

Spread the love

शेगाव :- आपलं बुलढाणा जिल्‍हा बातमी- येथील शिवनेरी चौक परिसरात एका विशिष्ट समाजाच्या व्यक्ती कडून २१ वर्षीय युवतीचा विनयभंग झाल्याची घटना १० जून रोजी रात्री ८.३० वाजता घडली.
याबाबत पिडीत युवती कडून शहर पोलीसात तक्रार दिली की, पोलीस भरतीच्या तयारी करिता मी दररोज मुरारका कॉलेजच्या मैदानावर मैत्रीणीसह प्रशिक्षण करिता जाते. १० जून रोजी घरी जात असताना सराफ हॉस्पीटल समोर शिवनेरी चौक येथुन माझ्या दोन्हीही मैत्रीनी हया समोर चालत होत्या व मी त्यांच्या मागे जात असताना एक इसम हा तेथे उभ्या असलेल्या ट्रक क्रं एम एच २६ए. डी १०८२ मधुन उतरुन माझे जवळ आला व त्याने वाइट उददेशाने माझी गालाची पप्पी घेण्याचा प्रयत्न केला असता त्याचा हाताचा मला धक्का लागल्याने मी जोराने ओरडले असता त्या ठिकाणी लोंकाची गर्दी जमा झाली. त्या गर्दीचा फायदा घेवुन आरोपी हा तेथुन निघून गेला असता तेथे उभ्या असलेल्या लोंकाकडुन मला त्याचे नाव शेख अहमद शेख समद रा खमु जमदार नगर 3 शेगाव येथील असल्याचे समजले.तरी त्याचे वर कायदेशीर कारवाई व्हावी अशा फिचे तोंडी रिपोर्ट वरुन आरोपी शेख अहमद शेख समद रा. खमु जमदार नगर शेगाव विरुद्ध कलम ३५४, ३५४ अ भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page