एकास केले जीवे मारण्याचा प्रयत्न दुचाकीला दिली धडक
मोताळा : आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- जीवे मारण्याच्या उद्देशाने एका दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याची घटना ९ जून रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास तरवाडी शिवारात घडली होती. याप्रकरणी फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत कलमांमध्ये वाढ केली आहे.
विठ्ठलसिंग ईश्वरसिंग तोमर हे ९ जून रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या एमएच-२८-एएल ६९७९ क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. दरम्यान सौरभ श्रीधर तायडे यांनी त्यांच्या ताब्यातील एमएच-२८- बीडब्ल्यू-०५५६ क्रमांकाचे वाहन भरधाव चालवून विठ्ठलसिंग तोमर यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली होती. यात तोमर जखमी झाले होते. तक्रारीवरून पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान फिर्यादीने ११ जून दिलेल्या पुरवणी जबाबावरून या प्रकरणाने वेगळी कलाटणी घेतली.पैशाच्या वादातून सौरभ तायडे यांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या ताब्यातील वाहनाने जबर धडक दिल्याने जबाबात त्यांनी म्हंटले आहे.