Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)
केंद्रीय आयुष्य ,आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री ( स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी घेतले गजानन महाराजांचे दर्शन…
मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यात येताच मंत्री महोदय गजानना चरणी लीन...
शेगाव-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी – खा. प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचे बुलढाणा जिल्ह्यात आगमन झाले आणि आज सकाळी प्रतापराव जाधव यांनी शेगाव येथे संत गजानन महाराज यांच्या मंदिरात जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले.आज संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशी निमित्त विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली या पालखीमध्येही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव सहभागी झाले त्यांनी वारकऱ्यांना अभिवादन करत संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले.