शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सोसे व जायभाये यांनी सामूहिक दिला आत्मदहनाचा इशारा
सिंदखेडराजा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये वादळी पावसासह गारपीट मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान व शेडनेटचे शंभर टक्के नुकसान होऊन शेतकऱ्याला न्याय मिळावा याकरीता बालाजी सोसे यांनी 18 मागण्या केल्या होत्या सिंदखेड राजा तहसील कार्यालयासमोर सहा दिवस आणि पळसखेड चक्का येथे चार दिवस अन्नत्याग आमरण उपोषण केले सोसे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता सर्व राजकीय पक्षातील नेतेमंडळींनी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सिंदखेडराजा तहसील समोर जवळपास दहा हजार लोकांनी 14 डिसेंबर रोजी रस्तारोको केले श्री गजानन जायभाये यांनी गोंदण खेड तालुका देऊळगाव राजा येथे पिक विमा संदर्भामध्ये तीन दिवस अन्नत्याग आमरण उपोषण केले त्यावेळी उपजिल्हाधिकारी जिल्हा कृषी अधीक्षक माननीय तहसीलदार साहेब तालुका कृषी अधिकारी व जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या उपोषण स्थळाला भेट दिली आणि
श्री बालाजी सोसे यांचे पहिलं उपोषण सोडण्याचे आश्वासन कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी फोन करून मदत देण्याचे दिले होते आश्वासन आणि डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब यांनी सुद्धा उपोषण सोडते वेळेस आश्वासने दिली दुसरे उपोषण माननीय जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्या मध्यस्थीने तहसीलदार साहेब सिंदखेड राजा तालुका कृषी अधिकारी साहेब, यांनी लेखी आश्वासन दिल्याने श्री बालाजी सोसे यांनी विनोद भाऊ वाघ यांच्या मध्यस्थीने उपोषण सोडले
श्री गजानन जायभाये यांनी कपाशी पिक विमा संदर्भामध्ये शेतकऱ्याकडून नजरचुकीने स्टॅंडिंग क्रॉप ऐवजी हार्वेस्टिंग क्रॉप ऑनलाईन मध्ये नजरचुकीने चूक झाल्याने शेतकऱ्याचे अर्ज नाकारण्यात आले त्याकरिता व बागायती क्षेत्राची मदत मिळावी यासाठी व पिक विमा संदर्भामध्ये नाकारण्यात आलेल्या शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा देण्यात यावा याकरिता दोघांनी सुद्धा उपोषण करून लेखी आश्वासन देऊन सुद्धा आज पर्यंत कुठली मदत न मिळाल्याने दिनांक 18/ 6/ 2024 रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालय सिंदखेडराजा येथे आत्मदहनाचा इशारा लेखी स्वरूपात दिला त्यामध्ये आम्हाला जर अटक केल्यास आम्ही अटक त्या क्षणापासून अन्नत्याग आमरण उपोषण पुन्हा सुरू करू असे त्यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे .त्यामुळे आता प्रशासन याकडे कशा पद्धतीने यांचे आंदोलन हाताळणार आहे व या भूमिकेकडे सर्वच शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे आणि या अगोदरच्या उपोषणाला हजारोच्या संख्येने शेतकऱ्यांनी व संपूर्ण राजकीय नेते मंडळींनी पाठिंबा दिला .त्यामुळे आता हे आंदोलन कशा पद्धतीने पुढे जात आहे याकडे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.