रायपूर परिसरात डेंग्यूचे रुग्ण वाढले
रायपूर- आपलं बुलढाणा जिल्हा. बातमी- तालुक्यातील रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत रायपूर येथील गावामध्ये गेल्या एक महिन्यापासून डेंगूसदृश्य तापाची साथ जोमात चालू असून याकडे ग्रामपंचायत व आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत पिंपळगाव सराई पांगरी नांद्रा कोळी केसापूर सैलानी भडगाव रुईखेड या गावासह 16 गावांचा समावेश आहे तसेच रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सहा उपकेंद्र समावेश आहे यामध्ये पिंपळगाव सराई उपकेंद्रावर दोन आरोग्य सेवकांच्या जागा बऱ्याच दिवसापासून रिक्त आहे तसेच रायपूर येथे सुद्धा दोन आरोग्य सेवकांच्या जागा रिक्त आहे व रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधी निर्माता हे पद गेल्या एक वर्षापासून रिक्त आहे रायपुर प्राथमिक आरोग्य केंद्राला गेल्या एक वर्षापासून कनिष्ठ लिपिक नसल्यामुळे आरोग्य केंद्राचा कारभार ढासळलेला आहे रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण 40 कर्मचारी आहे त्यापैकी सहा जागा रिक्त आहे तसेच काही कर्मचारी फक्त प्राथमिक आरोग्य केंद्राला हजेरी लावून सही करून निघून जातात त्यामुळे या परिसरातील आरोग्यसेवा कोलमाडली आहे रायपूर गावामध्ये एका महिन्यामध्ये जवळपास डेंगू चे जवळपास 30 रुग्ण आढळले असून हे रुग्ण खाजगी दवाखान्यामध्ये उपचार घेत आहे याप्रकरणी बुलढाणा तालुका आरोग्य अधिकारी महेंद्र सरपाते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की रिक्त पदे भरण्यासाठी वरिष्ठांकडे मागणी केली आहे तसेच रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यासाठी वरिष्ठांकडे अहवाल दिलेला आहे तसेच तसेच रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी शेख उस्मान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की रायपुर गावामध्ये डेंगूसदृश्य तापेचे रुग्ण असल्याची त्यांनी कबुली दिली डेंगूची सात कमी होण्यासाठी रायपूर ग्रामपंचायतला नाल्यांची साफसफाई तसेच पाणी शुद्धीकरणासाठी पत्र दिले असल्याचे त्यांनी सांगितले तसेच रायपूर गावामध्ये डेंगूच्या सात विषयी सर्वेक्षण करण्यासाठी दहा टीम द्वारे कंटेनर सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून प्रत्येक गावामध्ये रोगराई वाढण्याची शक्यता आहे तरी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रिक्त असलेल्या जागांची त्वरीत नेमणूक करावी अशी मागणी रायपूर येथील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केलेली आहे़