शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होणार
बुलढाणा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- आंतरराष्ट्रीय योग दिवस शुक्रवार, दि. 21 जून रोजी सकाळी ६.३० वाजता जिजामाता क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आला आहे.
जिल्ह्यात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. योगाभ्यासाच्या माध्यमातून शिक्षीत, सुसंस्कृत व स्वस्थ नागरिक, युवक घडविणे, तसेच योगाचा प्रचार व प्रसार होण्यास मदत होणार आहे, योग दिनाच्या आधारे जनतेमध्ये कायमस्वरुपी, चिरस्थायी जनहित निर्माण करणे हे उद्दीष्ट आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, माध्यमिक, प्राथमिक शालेय शिक्षण विभाग, आयुष मंत्रालय, जिल्हा योग संघटना, नेहरू युवा केंद्र, क्रीडा भारती, आरोग्य भारती, आर्ट ऑफ लिव्हींग, योग विद्याधाम, योगांजली योग वर्ग, पतंजली योग समिती, एकविध खेळ संघटना, शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना, एएसपीएम महाविद्यालय, आयुर्वेद, नर्सिंग महाविद्यालय आणि आयुष मंत्रालय यांचे निर्देशीत मानकानुसार जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलात योगदिन साजरा करण्यात येणार आहे.सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.