कृषी दिनानिमित्त शहरात ‘ग्रीन बुलडाणा मिशन’
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी : जिल्हा प्रशासन, बुलडाणा नगर पालिका आणि इंडियन रेड क्रॉस समितीतर्फे कृषी दिनानिमित्त दि. 1 जुलै 2024 रोजी शहरामधील प्रमुख रस्ते, पादचारी रस्ते, ले-आऊट मधील खुल्या जागेवर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यासाठी ‘ग्रीन बुलडाणा मिशन’ राबविण्यात येणार आहे.
थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिध्द असलेल्या बुलडाणा शहराला पुर्वीचे गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी, तसेच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी या पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यात शहरातील शैक्षणिक, सामाजिक संस्था, अशासकीय संस्था सामुदायिक मंडळ, विविध संघटनाचे पदाधिकारी आणि नागरीकांनी राष्ट्रीय उपक्रमामध्ये सहभाग होणे आवश्यक आहे.सामुहिक वृक्ष लागवडीसाठी बुलडाणा नगरपालिका खड्डे खोदण्यासाठी मदत करणार आहे. त्यानुसार वृक्ष लागवडीसाठी संबंधितांनी परिसरातील सुयोग्य जागेची निवड करावी, तसेच याबाबत मुख्याधिकारी यांना जागाची व वृक्ष लागवडीकरीता आवश्यक रोपाची माहिती देण्यात यावी. वृक्ष लागवडीसाठी जागा उपलब्ध नसल्यास नगरपालिकेने निश्चित केलेल्या जागेवर वृक्ष लागवडीसाठी नागरिकांनी सहभाग नोंदवावा. तसेच सामुहिकपणे लावण्यात येणारी रोपे नागरिकांनी दत्तक घेऊन संगोपन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनने केले आहे.
वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी 9422181032, 9422884421, 9763516110, 8668836356, 9594532581 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.