शेतकरी बांधवांनो पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीला घाई करू नका कृषी अधिकारी यांचे आव्हान
जिल्ह्यात 7 लाख 35 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाच्या पेरणीचे नियोजन
बुलढाणा :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- मान्सूनच्या आगमनामुळे शेतकरी शेतीच्या तयारीला लागला आहे लवकरच पेरणी सुरू करण्याच्या तयारीत आहे शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीसाठी घाई करू नये असे आव्हान जिल्हा कृषी अधिकारी ढगे साहेब यांनी केले आहे.
आपल्या प्रत्येक भागात 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये सध्या जिल्ह्यात जूनच्या सरासरीत 50 टक्के पाऊस झालेला आहे. 100 मिलिमीटर पाऊस झाल्यास जमिनीमध्ये ओलावा तयार होणार ज्यामुळे बीज अंकुरण्यासाठी मदत होईल त्यासाठी शेतकरी बांधवांना पेरणीसाठी घाई करू नका पुरेसा पाऊस झाला की पेरणीला सुरुवात करा असे जिल्हा कृषी अधिकारी यांनी सांगितले आहे.बुलढाणा जिल्ह्यामध्ये 7 लाख 35 हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर खरीप पिकाच्या पेरणीचे नियोजन केले आहे. यामध्ये प्रमुख पिके हे कापूस सोयाबीन आणि तूर हे आहे. सोयाबीनचे चार लाख हेक्टर क्षेत्र, कापसाचे 1 लाख 98 हजार हेक्टर क्षेत्र, व तुर 85 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन आहे. या पेरणी साठी लागणारे बियाणे व खत पुरवठा हा जिल्ह्यात पुरेसा आहे. शेतकऱ्यांनी कुठल्याही एका विशिष्ट खताची मागणी न करता बाजारात असलेले सर्वच बियाणे व खते दर्जेदार आहे. सर्वच प्रकारचे बियाणे खते व आधुनिक हे वापरणे आवश्यक आहे.
आज रोजी जिल्ह्यामध्ये काही ठराविक भागात कापसाची पेरणी ही ज्या ठिकाणी संरक्षण सिंचनाची सोय आहे अशा भागामध्ये कापसाची पेरणी केलेली आहे. 100 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झालेले चार तालुके आहे त्या भागात सोयाबीनची पेरणी झालेली आहे.