भरधाव मिनी ट्रकने दुचाकीला दिलीप जबरदस्त धडक
अपघातात पत्नी ठार, पती जखमी
नांदुरा : आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- भरधाव मिनी ट्रकचालकाने दुचाकीला धडक दिल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर पती जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील वडी फाट्यानजीक १४ जून रोजी सकाळी ११:४५ वाजेदरम्यान घडली.
याबाबत जानकीराम तुकाराम निंबाळकर (५९), रा. नवी येरळी, ता. नांदुरा यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यामध्ये ते पत्नीसह दुचाकीने राष्ट्रीय महामार्गाने येत असताना वडी फाट्यानजीक मिनी ट्रक क्रमांक एमएच २७ एक्स ७८४० च्या चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकीस्वार मनोरमा जानकीराम निंबाळकर (४८) यांचा जागीच मृत्यू झाला, तर तक्रारकर्ता जखमी झाल्याचे म्हटले. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी मिनी ट्रकचालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.