कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी हरणाचा मृत्यू…
देऊळगाव राजा : आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या हरणाचा मृत्यू झाल्याची घटना निमखेड शिवारात घडली. वनातून भरकटलेले हरणाचे पाडस निमखेड शिवारात आले असता कुत्र्यांनी त्याचा पाटलाग करून त्याच्यावर झडप घातली होती. परिसरातील नागरिकांनी त्याला कुत्र्याच्या तावडीतून सोडवले होते. यात या पाडस गंभीर जखमी झाले होते. नवपरिक्षेत्र अधिकाऱ्याला याबाबत माहिती देण्यात आली होती. वनपरिक्षेत्राचे अधिकारी हे
घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, तोपर्यंत रक्तभंबाळ झालेल्या हरणाच्या पाडसाने आपले प्राण सोडले होते. पोस्टमॉटम करून हरणाला दफन करण्यात आले.काही भागात चांगला पाऊस झाला असला तरी अनेक भागात पावसाचे आगमन झालेले नाही. यामुळे जंगलात पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने प्राणी भटकंती करताना दिसून येत आहेत. त्यातच भटके कुत्रे या संधीचा गैरफायदा घेत पाण्याच्या शोधात असलेल्या जंगली प्राण्यांचे लचके तोडतात. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.