50 खेडी जोडल्या गेलेल्या देऊळगावमही मध्ये प्रवासी निवारा नसल्याने प्रवाश्यांची होतेय गैरसोय…
15 दिवसात प्रवाशी निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा भाजपा च्या वतीने तिव्र स्वरूपाचे आंदोलन...
देऊळगावराजा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या देऊळगावमही हे गाव खामगाव जालना महामार्गावर अस्तित्वात आहे… या गावाला 50 खेडी जोडल्या गेली असून ऐतिहासिक बाजार पेठ आहे मात्र या ठिकाणी प्रवाशी निवारा नसल्याने प्रवाश्यांची मोठी गैरसोय होताना दिसते आहे… या संदर्भात आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्याकडे कित्येक वर्षापासून ग्रामस्थानी मागणी केली आहे अद्याप पर्यंत ही मागणी पूर्ण केल्या गेली नाही त्यामुळे भाजपाच्या वतीने जिल्हा प्रशासन व आ शिंगणे यांना निवेदन देण्यात आले आहे.. 15 दिवसात प्रवाशी निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लावला नाही तर देऊळगावमही भाजपा च्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपचे नेते कैलास राऊत यांनी दिला आहे